सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर समाजातील गोरगरीब वंचितांची दिवाळी गोड व्हावी...
सहसंपादकः-
प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर समाजातील गोरगरीब वंचितांची दिवाळी गोड व्हावी म्हणून डिसेंट फाउंडेशनने एक साडी "ती" च्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आवाहन केले होते. येत्या दिवाळीसाठी गरीब गरजू कुटुंबातील भगिनींना आपण आपल्याकडील नव्या अथवा ठेवण्यातल्या सुस्थितीत असलेल्या साड्या देऊ शकता. आणि या आवाहनाला समाजातील अनेकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत जवळपास चार हजार नव्या व जुन्या साड्यांचे ग्रामीण भागासह पुणे मुंबई येथूनही संकलन झाले आहे.
त्यामध्ये पुणे येथील मॅग्नोलिया वुमन्स ग्रुपच्या गौरी ढोले पाटील,नूतन
बनकर, जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या डॉक्टर स्वाती घोरपडे
डॉक्टर पिंकी कथे व त्यांच्या सर्व सदस्या, गृहपाल अर्चना
पवार, समाजसेविका अश्विनी नवले, समाजसेविका राजश्री कदम, एम
आय टी कॉलेज आळंदीचे विद्यार्थी, लेण्याद्री महिला पतसंस्थेच्या
अध्यक्षा श्रीमती अलकाताई माळी व त्यांचे सर्व संचालक, जिजामाता ग्राम
संघ डिंगोरे च्या अरुणा उकिर्डे, निलोफर पठाण व त्यांच्या सर्व सदस्या,
श्री
स्वामी समर्थ सेवेकरी प्रतिभा मेहेर व त्यांच्या सर्व सेवेकरी भगिनी, तालुका
आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ, जुन्नर ग्रामीण रुग्णालयातील सर्व
डॉक्टर्स व परिचारिका अशा अनेक महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला उदंड
प्रतिसाद दिला. त्याचबरोबर दिवाळीच्या फराळासाठी देखील अनेकांनी सहकार्य केले.
त्यामध्ये जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, नगरचे उपविभागीय
पोलीस अधिकारी निलेश वाजे, नायब तहसीलदार सचिन मुंडे, वडज
विठ्ठलवाडीचे सरपंच आदिनाथ चव्हाण निर्यातदार राजेंद्र वऱ्हाडी, इतिहासाचे
अभ्यासक प्राध्यापक डॉ. लहुजी गायकवाड, बांधकाम व्यावसायिक शिरीष डुंबरे,
वरिष्ठ
पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, कृषी तज्ञ डॉक्टर संतोष सहाणे, ओम
साई सेवा ग्रुप मुंबईचे संजय सरोदे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी पांडुरंग
तोडकर, पोलीस अधिकारी बाळासाहेब साबळे, हॉटेल व्यवसायिक
गणेश रेळेकर, लोकनियुक्त सरपंच राहुल दातखिळे, प्राध्यापक शरद
मनसुख, सौ साधना कामठे, श्री संदेश थोरात, श्री
विश्वास काळे, लेखापरीक्षक इम्तियाज चौगुले, एडवोकेट मल्हारी
गोसावी, डॉक्टर प्रवीण शिंदे, डॉक्टर अजित वलवणकर, प्राध्यापक
अनिल उंडे, समीर जाधव, सत्यवान खंडागळे, संतोष
रोकडे ,जालिंदर लांडे, राजेश गावडे, दिलीप भगत,
विकास
ताम्हणे, पोलीस पाटील विलास बटवाल, प्रशांत लोखंडे, गणेश हांडे,
माजी
सरपंच अजित चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, संदीप वायाळ, बाळासाहेब
खिलारी, बाळासाहेब खोकराळे, महेंद्र खिलारी, प्रकाश नवले,
संतोष
पवार महावीर चौधरी इत्यादी लोकांनी योगदान दिले.
जमा झालेल्या चार हजार साड्यांबरोबरच ६०० दिवाळी फराळाचे पॅकेटही
वाटणार असल्याचे संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
ऊस तोडणी महिला कामगार वीट भट्टीवरील महिला कामगार तसेच विविध
ठिकाणच्या आदिवासी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन या साड्या व फराळ वाटणार
असल्याचे संस्थेचे प्रकल्प समन्वयक एफ . बी. आतार यांनी सांगितले.
COMMENTS