लखनौ (उत्तर प्रदेश): देशभर गाजलेल्या 'निर्भया' प्रकरणाची पुनरावृत्ती गाझियाबादमध्ये झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्...
लखनौ (उत्तर प्रदेश): देशभर गाजलेल्या 'निर्भया' प्रकरणाची पुनरावृत्ती गाझियाबादमध्ये झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीची रहिवासी असलेली महिलेवर (वय ३८) सामूहिक बलात्कार झाला आहे.
शिवाय, गुप्तांगात रॉड घातलेल्या आणि पोत्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी हा प्रकार दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारा आहे, असे म्हणत पोलिसांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. पीडित महिला १६ ऑक्टोबर रोजी तिच्या भावाच्या वाढदिवसाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी गाझियाबादला गेली होती. तेथून परतताना ती रिक्षाची वाट पाहत होती, तेव्हा चार जणांनी तिचे कारमधून अपहरण केले होते.
चौघांसह आणखी एकाने तिच्यावर दोन दिवस सामूहिक बलात्कार करूनअतोनात छळ केला. पीडित महिलेची तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. आयोगाने वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS