सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : आदिवासी विकास मंच व सह्याद्री बिरसा ब्रिगेड महाराष्ट राज्य यांच्या वतीने लेण्याद्री ...
सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : आदिवासी विकास मंच व सह्याद्री बिरसा ब्रिगेड महाराष्ट राज्य यांच्या वतीने लेण्याद्री भक्त भवन येथे आदिवासी समाज प्रबोधन मेळावा व महादेव कोळी चौथारा अभिवादन दिन साजरा करण्यात आला यावेळी शरद पवार बोलत होते.
जंगल वाचवण्याचं काम आदिवासी समाज करतो. जंगल वाचलं तर पाऊस येईल, पाऊस आला तरच जमीन टिकेल. आदिवासी समाजमुळंच पर्यावरण टिकून राहिलं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.आज आदिवासी समाजाला नक्षलवादी म्हटलं जातं. कसं काय तुम्ही नक्षलवादी म्हणता? आदिवासी समाजावर भूकबळी होण्याची वेळ येते आणि अत्याचार होतात आजच्या मेळाव्याला तुम्ही अन्नधान्य घेऊन आलात. तुमच्या भोजनाची सोय तुम्ही केलीत. यातून तुम्ही लाचार नसून स्वाभिमानी असल्याचं स्पष्ट केलं आणि ज्यांनी जल,जंगल व जमीन वाचविली तो म्हणजे आदिवासी असल्याचे शरद पवार म्हणाले.
आज आदिवासी समाजाला नक्षलवादी म्हटलं जातं. कसं काय तुम्ही नक्षलवादी म्हणता? आदिवासी समाजावर भूकबळी होण्याची वेळ येते आणि अत्याचार होतात. अशा परिस्थितीत त्यांना आवाज उठवावा लागतो, त्यातून संघर्ष निर्माण होतो. हा तुम्हाला नक्षलवाद वाटत असेल तर तो तुम्हाला खुशाल वाटू द्या. ते त्यांच्या गरजांसाठी लढत असतात असेही पवार म्हणाले. 15 ऑक्टोबर ला नागपुरात होणाऱ्या आदिवासी समाजाच्या आंदोलनात असेच मोठ्या संख्येने सहभागी व्हा. जगात एकोप्याचा संदेश द्या, असे आवाहनही शरद पवार यांनी केलं
शिवजन्मभूमीत गांधी जयंती दिवशी हा मेळावा घेतला त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो असेही पवार म्हणाले. काही लोक म्हणतात तुम्ही यांच्याशी जास्त संबंध ठेवता. तुम्हाला माहित आहे, हे नक्षलवादी आहेत. मी म्हणतो मला माहित आहे. पण हे कसले नक्षलवादी आहेत तर आम्ही कोणाला धक्का लावणार नाही, पण आम्हाला धक्का लावला तर आम्ही त्यास सडेतोड उत्तर देतो. असा हा नक्षलवाद असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ बोलताना म्हणाले कि काहीच रडून भेटत नाही त्यासाठी लढा द्यावा लागतो आणि त्यासाठीच हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. किल्ले शिवनेरीवर महादेव कोळी चौथारा याठिकाणी शासन करत्यानी कोणतेही कारण न देता तेथील अडचणी दुरुस्त करून कोनशीला लावली पाहिजे. बोगस आदिवासींवर बोलताना भुजबळ म्हणाले कि आम्ही बोगस आदिवासींना बाजूला करून ताबडतोब त्या जागी मुल आदिवासींची नेमणूक करा परंतु मंत्रालयात अनेक झारीतील शुक्राचार्य बसलेले असतात ते काही तरी कारण काढतात असतात. ५ जी आले आणि त्यात आमची पोर बाळ जर हजार दोन-चार हजारात विकली जात असेल आणि एव्हढी गरिबी असेल तर हा देश कुठे आहे असा प्रश्न यावेळी त्यांनी निर्माण केला. जेंव्हा जेंव्हा मागासवर्गीय आवाज उठवतील तेंव्हा तेंव्हा त्यांच्या मागे खेट्या नाट्या केसेस सारखे प्रकार घडत असतात. सरस्वतीचा फोटो काढा असे नाही तर स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, शिक्षणासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे पूजन शाळेत करा असे भुजबळ यावेळी म्हणाले.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट राज्याचे प्रथम आदिवासी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व पुरवढा मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे,जुन्नरचे आमदार अतुल बेनके, नंदुरबारचे आमदार अमशा पाडवी, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, डॉ किरण लहामटे, आमदार सुनिल भुसारा, राष्टीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेड सतीश पेंदाम बिरसा ब्रिगेड,आमदार दिलीप मोहिते पाटील, समता परिषद राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, जि प.सदस्य देवराम लांडे, पांडुरंग पवार, बिरसा ब्रिगेड सह्याद्री अध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्याध्यक्ष डॉ विनोद केदारी, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रविण पारधी, सह्याद्री मातृ शक्ती प्रमुख संगीता तळपे व आदिवासी विकास मंच महाराष्ट सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी समाजातील अनेक नेते कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्तीत होते.
शरद पवार यांना तीर कामठा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नरहरी झिरवळ,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व पुरवढा मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, सतीश पेंदाम आदींनी मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी आदिवासी वस्तूंचे प्रदर्शन, साहित्य व पुस्तक प्रदर्शन, मेडिकल कॅम्प, नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार, डॉ गोविन गारे सन्मान पुरस्कार, रुखामिनीबाई खाडे मातृशक्ती सन्मान पुरस्कार देऊन नागरिकांना सन्मानित करण्यात आले. विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तींचा जय पालसिंग मुंडा स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वेगवेगळ्या तालुक्यातून क्रांतीकारकांच्या मशाली घेऊन कार्यकर्ते पहाटे अभिवादन करण्यासाठी किल्ले शिवनेरीवर गेले होते आणि पुन्हा त्या मशाली घेऊन अभिवादन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घोडे यांनी तर आभार डॉ. विनोद केदारी यांनी मानले.
चौकट :- किल्ले शिवनेरी विकास कामानासाठी प्रचंड निधी दरवर्षी येतो परंतु त्यातील एक हि रुपया किल्ले शिवनेरी वरील महादेव कोळी चौथार्यासाठी वापरला जात नसल्याची खंत यावेळी आदिवासी विकास मंच व बिरसा ब्रिगेड महाराष्ट राज्य यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. ह्या चौथ-र्याला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा मिळावा तसेच अद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
COMMENTS