क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना व घरकुल योजनेचा समारंभ दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोज...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना व घरकुल योजनेचा समारंभ दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वा.
जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जि.प.सदस्य देवराम लांडे, कात्रज दूध संघाचे संचालक भाऊसाहेब देवाडे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस अमोल लांडे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच उत्तम घुले यांनी करत प्रास्ताविक करताना त्यांनी गावच्या विकासावर भाष्य करताना बोतार्डे गावात स्मशानभूमी, रस्ते, घरकुले, पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर याविषयी माहिती देत नविन वल्लभनगर स्थापन करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत यावर आमदार अतुल बेनके व भाऊसाहेब देवाडे यांचा बोतार्डे गावाशी असलेली चांगली घडसण व त्यांच्या माध्यमातून झालेला विकास यावर देखील भाष्य केले.
तसेच गावच्या विकासाला ज्या अडचणी येतायत त्या सोडविण्यासाठी आमदार अतुल बेनके कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
कात्रज दूध संघाचे संचालक भाऊसाहेब देवाडे म्हणाले की, बोतार्डे गावच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही, मात्र सध्या मंत्रीमंडळातील फेरबदलांमुळे जी कामे मागील सरकारने घेतली होती ती सध्या बंद आहेत, मात्र तरीदेखील केंद्रसरकारमधील खासदार डॉ.अमोल कोल्हे व शरदचंद्रजी पवार व अजित पवार यांच्यामुळे हि पाणीयोजना गावोगावी पोहोचत असल्याने या गोष्टीचा आनंद आहे असे त्यांनी सांगितले.
देवराम लांडे यांनी त्यांच्या खास शैलीत आपले मनोगत मांडत गावच्या राजकारणात उत्तम घुले मामा आहेत म्हटल्यावर याहीवेळेस येथे महिलाराज येईल असे सांगताच नागरिकांनी टाळ्या वाजवत लांडेंना समर्थन दिले.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, बोतार्डे गाव हे वल्लभ बेनके यांच्या आवडीचं गाव असल्याने या गावाला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही पण येत्या ग्रामपंचायतीला राष्ट्रवादीला बहुमताने निवडून देण्याची जबाबदारी तुमची असल्याची भावना बेनके यांनी मांडली. तसेच बोतार्डे गावातील उत्तम घुले मामा, रामदास आमले, गहिनाजी तलांडे व ग्रामस्थ हे वेळोवेळी गावच्या विकासाची कामे माझ्यापर्यंत घेऊन येतात त्यामुळे त्यांना मानावे लागेल असेदेखील बेनके म्हणाले.
यावेळी गावचे सरपंच मच्छिंद्र केदार, उपसरपंच उत्तम घुले, रामदास आमले, गहिनाजी तलांडे, महंतराज बाबा अंजनगावकर, मोहन लांडे, दत्तात्रय आमले, आनंद आमले व ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जवळजवळ १ कोटी ३७ लक्ष २१ हजार रूपयांचा निधी बोतार्डे गावाला दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार अतुल बेनके यांचे आभार मानले.
यावेळी अल्पोपहार देखील देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच उत्तम घुले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ.विशाल आमले यांनी मानले.
COMMENTS