विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील इयत्ता बारावी सायन्स मधील कुमारी नम्रता शशिकांत मोरे या विद्यार्थिनीने कनिष्ठ महाविदयालयीन गटामध्ये तृतीय क्रमांक मिळविला या उज्वल यशाबद्दल जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष अँड संजयराव काळे साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.अध्यक्ष प्रतिनिधी व्ही बी कुलकर्णी, प्राचार्य डॉ दिपेंद्र उजगरे, उपप्राचार्य डॉ एम बी वाघमारे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती पी एस लोढा, पर्यवेक्षक प्रा एस ए श्रीमंते, व्यावसायिक विभाग प्रमुख प्रा के जी नेटके, वक्तृत्व विभाग प्रमुख प्रा एस डी सोनार, याप्रसंगी कुमारी नम्रता मोरेचे पालक व कुटुंबीय तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते.
COMMENTS