पु णेः मोका अधिनियम सन १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी असलेला कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन (गज्या) मारणे (टोळी प्रमुख) यास खंडणी ...
पुणेः मोका अधिनियम सन १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी असलेला कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन (गज्या) मारणे (टोळी प्रमुख) यास खंडणी विरोधी पथक - २ गुन्हे शाखेने अटक केली आहे.
नमुद फरारी
गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे हा रविवारी (ता. १६) वाई, सातारा येथे येणार असल्याबाबत खंडणी विरोधी पथक-२ कडील पोलिस
अधिकारी यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे
वेग-वेगळी पथके तयार करुन पुणे ग्रामीण, सातारा
जिल्हा परिसरात रवाना करण्यात आले होते. त्याप्रमाणे तपास पथकातील पोलिस अधिकारी व
अंमलदार यांनी नमूद फरारी गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे यास बावधन गाव (ता. वाई, जि. सातारा) येथून ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीकामी
गुन्हयाचे तपासी अंमलदार नारायण शिरगावकर, सहा. पोलिस
आयुक्त, गुन्हे-२, पुणे शहर
यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची
कामगिरी ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस
आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, (गुन्हे), रामनाथ पोकळे, पोलिस उप
आयुक्त,(गुन्हे), श्री.श्रीनिवास
घाडगे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे-२ नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी
पथक-२, गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक, बालाजी पांढरे, सहा.पो.निरी.चांगदेव सजगणे, पोलिस
उपनिरीक्षक, श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलिस
अंमलदार, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, सचिन
गायकवाड, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, विजय गुरव, प्रदिप शितोळे, विनोद
साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल
पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले, प्रदिप गाडे, चेतन
शिरोळकर महिला पोलिस अंमलदार, आशा कोळेकर
यांनी केलेली आहे.
COMMENTS