सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : ज्ञान ग्राम अंतर्गत साकारणार नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेचा पथदर्शी प्रकल्प गोखल...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : ज्ञान ग्राम अंतर्गत साकारणार नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेचा पथदर्शी प्रकल्प
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठासोबत नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.या निमित्ताने "नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोग योजना" व "ज्ञानग्राम"उपक्रमांचा पथदर्शी प्रकल्प सामंजस्य करारातून व प्रकल्प नियोजन बैठकीतून महाविद्यालयामार्फत सुरू झाल्याची माहिती सचिव विवेक शेळके यांनी दिली.
महाविद्यालयांनी निवडलेल्या गावामध्ये शाश्वत ग्राम विकासाचे सात महत्वाचे संशोधन प्रकल्प विद्यार्थी व प्राध्यापक यांचे सहयोगाने हाती घेण्यात येत आहेत. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र यासाठी मार्गदर्शन करणार आहे. जैव विविधता (पर्यावरणीय शाश्वतता),जल संवर्धन जल सुरक्षा, गुणवत्तापूर्ण विकास शिक्षण, स्वास्थ्यपूर्ण आरोग्य, हरित ऊर्जा-(वेस्ट टू वेल्थ), स्थानिक विकास प्रशासन सक्षमीकरण,शाश्वत शेती या विषयाबाबत समस्या संशोधन व प्रशिक्षण आणि समस्या निराकरण उपाय शोधून महाविद्यालय, पंचायतराज प्रशासन आणि गोखले अर्थशास्त्र अभिमत विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने "ज्ञान ग्राम-शाश्वत ग्राम" या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी उन्नत भारत अभियान आणि उन्नत महाराष्ट्र अभियान या केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या शिक्षणाला ग्रामीण विकासाशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षा व राज्याच्या विकासात उच्च शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणाऱ्या योजनांचा उपयोग करून घेण्यात होणार आहे असे
डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.कैलास बवले यांनी सांगितले.यशदा संस्थेच्या जलसाक्षरता केंद्राचे माजी संचालक डॉ.सुमंत पांडे यांनी शाश्वत ग्राम विकासासाठी शासन व प्रशासन सहयोग या विषयावर या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी परिसरातील विकाससंबंधी छोट्या छोट्या प्रश्नावर अभ्यास व संशोधन करून अहवाल तयार करावेत, प्राध्यापकांनी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी. या सर्व अहवालाच्या एकत्रिकरणातून विद्यापीठ संशोधन प्रकल्प अहवाल तयार करेल व शासनास उपयुक्त धोरणं सुचवेल असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अजित रानडे यांनी आश्वस्त केले.
याप्रसंगी कुलगुरू डॉ.अजित रानडे,कुलसचिव डॉ. कपिल जोध व प्रा.डॉ.कैलास बवले, समर्थ संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके उपस्थित होते.
सदर प्रकल्पासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके व उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके यांनी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS