सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : कॅपजेमिनी आणि एज्युब्रिज लर्निंग च्या माध्यमातून ४ लाखांचे पॅकेज समर्थ ग्रुप ऑफ इन्स...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : कॅपजेमिनी आणि एज्युब्रिज लर्निंग च्या माध्यमातून ४ लाखांचे पॅकेज
समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉप्युटर इंजिनिअरिंग विभागातील १७ विद्यार्थिनींची कॅपजेमिनी मध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
नवीन जॉब मार्केटनुसार विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये जाणून घेण्याची आणि अपग्रेड करण्याची त्याचबरोबर नामांकित कॉर्पोरेट कंपन्यासोबत काम करण्याची संधी मिळावी या हेतूने ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
कॅपजेमिनी आणि एज्युब्रिज लर्निंग द्वारे सखी दृष्टीकोन या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमांतर्गत २०१९ ते २०२२ या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थीनी उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मुंबई, पुणे, बंगलोर अशा कॉर्पोरेट ठिकाणी नोकरी करण्याची संधी सखी दृष्टिकोन च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
सदर विद्यार्थिनींना प्रतिवार्षिक ४ लाखाचे सॅलरी पॅकेज आणि जॉइनिंग बोनस रु.२५ हजार देण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी सांगितले.
या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये प्री-स्क्रीनिंग टेस्ट क्लिअर करणे गरजेचे होते. त्यामध्ये कृपा बोरचटे, कोमल आहेर, शुभदा नरसाळे, प्रतिक्षा बोरुडे, सोनाली टेमगिरे, श्रुती चौगुले, निशा भोर, शिवानी गोरडे, कोमल राऊत, शीतल खोडदे,अक्षदा कोरडे, मयुरी डेरे,प्रतिक्षा औटी, तनुजा शिंदे,अस्मिता मुळे तसेच बी सी एस च्या दोन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. या विद्यार्थिनींचे एक महिन्याचे सॉफ्ट स्किल्स आणि मुलाखत प्रशिक्षण तसेच अप्टीट्युड टेस्टची तयारी करून घेतली जाईल असे कॅपजेमिनी समन्वयक सौरभ फुलसुंदर यांनी स्पष्ट केले.
सदर मुलाखतीचे आयोजन करण्यासाठी विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS