पु णे: लग्नासाठी पै पै करुन साठवलेले कष्टाचे पैसे व दागिने चोरी करुन हैदराबाद येथे निघालेल्या चोरास अवघ्या काही तासांतच खडक पोलिसांनी अटक ...
पुणे: लग्नासाठी पै पै करुन साठवलेले कष्टाचे पैसे व दागिने चोरी करुन हैदराबाद येथे निघालेल्या चोरास अवघ्या काही तासांतच खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून २,५०,३०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.
आरोपी
मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी यास पकडणेकामी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना
योग्य त्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी याचा
शोध चालू असताना पोलिस अंमलदार संदीप तळेकर व विशाल जाधव, सागर घाडगे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी हा इनामके मळा लोहीयानगर
गंजपेठ पुणे या ठिकाणी आला आहे. सदर बातमीचे ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी राकेश
जाधव व त्यांचे पथकातील अंमलदार हे गेले असता तेथे आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन
चौधरी यास शिताफीने पकडण्यात आले. आरोपी मोहम्मद तमीम कलीमउददीन चौधरी याच्याकडून
गुन्हयातील चोरीस गेलेले २,००,०००/- रुपये रोख रक्कम जनाचे सोन्याचे दागिणे असे एकुण २,५०,३००/-
रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला व १० ग्रॅम आहे.
संबंधित
कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलिस उप
आयुक्त परिमंडळ १ पुणे व सतिश गोवेकर, सहा पोलिस
आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलिस स्टेशनचे संगीता यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, राजेश
तटकरे पोलिस निरीक्षक (गुन्हे), राकेश जाधव
सहा. पोलिस निरीक्षक, अतुल बनकर, पोलिस उप निरीक्षक व पोलिस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, राहुल शिंगे, मंगेश
गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार वाबळे, नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव, समीर शेख यांचे पथकाने केली आहे.
COMMENTS