आरोग्य टिप्स - किडनी स्टोन्स हा यूरिन सिस्टीमचा एक आजार आहे. शरीरात पाणी कमी मात्र कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्याने हा आजार होतो. यामध्ये किडनी...
आरोग्य टिप्स - किडनी स्टोन्स हा
यूरिन सिस्टीमचा एक आजार आहे. शरीरात पाणी कमी मात्र कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्याने
हा आजार होतो. यामध्ये किडनीमध्ये हळूहळू स्टोन्स तयार व्हायला लागतात. जेव्हा हे
स्टोन्स मोठे होतात, तेव्हा
त्यांच्या हालचालीमुळे अत्यंत वेदना आणि वारंवार उल्टी होणे अशा समस्या भेडसावतात.
स्टोन्सची कारणे
पाण्याची कमतरता
दिवसभरात किमान 7 ते 8
ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे किडनीत बनत असलेले स्टोन्स् युरिनमार्फत
बाहेर निघून जातील. युरिनचा रंग पिवळा असेल तर समजून जा की, तुम्हासला जास्त् पाणी पिण्याची
आवश्यकता आहे.
जास्त मीठ खाणे
जास्त मीठ किंवा खारे
पदार्थ खाल्याने किडनीमधील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. यामुळे किडनी फंक्शनवर विपरीत
परिणाम होतो व किडनी स्टोनची समस्याही होऊ शकते. चिप्स, पापड, लोणचे असे खारवलेले पदार्थ कमी
खा. जेवतांनाही वरून मीठ घेऊ नका.
चयापचय क्रियेचा आजार किंवा
सर्जरी
इन्फ्लेमेटरी बाउल
सिंड्रोम,
डायरियासारख्यात समस्या
किंवा गॅस्ट्रिक बायपासची सर्जरी केल्याने चयापचय क्रियेवर परिणाम होतो. यामुळे
शरीरात कॅल्शिअम आणि पाण्याचे शोषण योग्य होत नाही आणि किडनी स्टोनची शक्यता
वाढते.
साखर
शरीरातील साखरेचे
प्रमाण वाढल्या्ने कॅल्शिअम आणि मॅग्नेथशिअमचे अॅब्जॉरप्शन योग्य पद्धतीने होत
नाही. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. यामुळे मिठाई, सोडा आणि इतर साखर असलेले
खाद्यपदार्थ कमी प्रमाणात खा.
फॅमिली हिस्ट्री
कुटुंबात कोणाला किडनी
स्टोनची समस्या असेल, तर
तुम्हांलाही हा आजार होण्याचा धोका असतो. आणि जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर
स्टोन्सची संख्या वाढण्याचीही भिती असते. रोज 30 मिनिटांचा वॉक किंवा व्यायाम करा. यामुळे वजन आणि बीपी
कंट्रोलमध्ये राहिल आणि किडनी स्टोन्सची शक्यता कमी होईल.
COMMENTS