सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात १५ ऑक्टोबर डॉ ए पी जे अ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात १५ ऑक्टोबर डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत, डॉ.शिरीष नाना गवळी, बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले, फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, डॉ.बसवराज हातपक्की, गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अमोल भोर, परीक्षा अधिकारी प्रा.सचिन शेळके, नॅक समन्वयक डॉ.संदिप नेहे, ग्रंथपाल प्रा.गणेश नवले तसेच संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथालयातील पुस्तके,साहित्य, वाड्मय यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यावेळी डॉ.उत्तम शेलार म्हणाले की विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षी असणे गरजेचे आहे. एक वेळ अपयश आले तरी चालेल. वाचनाची आवड हि सवड काढून जोपासावी लागते. व्यायाम हे शरीर आणि मेंदू दोन्हींचा मेळ घालून प्रगल्भता मिळवण्याचे साधन आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करणेसाठी वाचन हे महत्वाचे आहेच.वाचनाने आकलन शक्ती, धारणक्षमता आदींमध्ये वाढ होते.वाचनासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांना त्यांचे इप्सित ध्येयपूर्तीसाठी मदत करणे हा या वाचन प्रेरणा दिनाचा हेतू असल्याचे डॉ.अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रखर तेज आणि वाणीवर प्रभुत्व केवळ वाचनानेच शक्य असल्याचे फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की यांनी सांगितले.
वाचनाने अनेक प्रश्नांची गूढ समजते. किंबहुना प्रत्येक गोष्टीची साध्यर्म कळते.तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचन संस्कृती संवर्धनासाठी व जोपासण्यासाठी नो गॅझेट डे,निरंतन वाचन, पुस्तक भेट, ऑनलाईन ई बुक्स चे वाचन इ.अनेकविध उपक्रमांचे आयोजन संकुलात करण्यात आले होते.
समर्थ संकुलात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल प्रा.गणेश नवले यांनी ऑनलाईन वाचन स्पर्धा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा इ.कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे नियोजन रा से यो समन्वयक प्रा.विपुल नवले ग्रंथपाल प्रा. गणेश नवले, क्रीडा शिक्षक डॉ. राजाभाऊ ढोबळे यांनी केले. प्रा.प्रदिप गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
COMMENTS