क्राईमनामा Live संपादकीय टिम. देश हा सुजलाम सुफलाम शेती व शेतकर्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने साहजिकच ग्रामिणतेशी त्याची नाळ जुळल्याचे ...
क्राईमनामा Live संपादकीय टिम.
देश हा सुजलाम सुफलाम शेती व शेतकर्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने साहजिकच ग्रामिणतेशी त्याची नाळ जुळल्याचे आपणास दिसेल. मात्र असे असताना सध्याचे शेतीचे अर्थचक्र मात्र पूर्णपणे कोलमडताना दिसत आहे.
देशपातळीवर प्रत्येक जीवनावश्यक व खाद्यपदार्थ तसेच भौतिक गोष्टीवर लादलेला जीएसटीचा बोजा आणि याच जीएसटीला मागील काही दिवसांपूर्वी देशातील एका वर्गाकडून झालेला तीव्र विरोध कारणही तसेच होते हे आपणास माहितच आहे. मात्र शेतकरी व ग्रामिण भागातील सर्वसामान्यांच्या हक्कापलीकडचा जीएसटी असल्याचाच दिसत आहे. त्यातही अवाढव्य असा करप्रणालीचा लादलेला बोजा हा निराशा व्यक्त करण्याचाच आहे.
अल्प नोकरदारांच्या भल्यासाठी लादलेला हा एकमेव कर आहे.
शेतीपिकांच्या बाबतीत फोल ठरलेला बाजारभाव व करप्रणाली हे त्याचेच द्योत्तक असल्याचे सध्याचे चित्र देश व देशातील राज्यांमध्ये पहावयास मिळत आहे.
उदा.मराठवाड्यातील कापसाचे पावसामुळे झालेले अतोनात नुकसान.
पश्चिम भागातील ऊस शेतीक्षेत्राचे भरमसाठ झालेले नुकसान.
जळगाव व नाशिक या भागात झालेले केळी व तत्सम पिकांचे फार मोठे झालेले नुकसान.
रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातील पूरपरिस्थितीच्या फेर्याने नारळ व पोफळीच्या बागांचे अतोनात झालेले नुकसान.
देशातील भातशेतीचे झालेले मोठे नुकसान.
या निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे शेतकर्यांच्या शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरकार दरबारी वेळेवर पंचनामे न करता मात्र साधी नुकसान भरपाई सरकार दरबारी मिळू शकत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही.
म्हणूनच ग्रामिण भागातील शेतीचे वास्तव मात्र चित्रात जसे रंगवावे तसेच रंगवताना दिसत आहे.
खर तर शेतकर्यांना सध्या आर्थिक संकटांच्या सामन्यातून जाताना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत.
अर्थकारणात शेतीला मोठे स्थान असताना शेतीची सध्याची दैन्यावस्था पाहता अर्थकारणात मोठी उलाढाल होईलच हे मात्र तितक्याशा प्रमाणात सांगता येणार नाही.
एकीकडे केंद्र सरकार आपल्या देशात कांद्याची परकीय देशातून आयात करत आहे मात्र त्यामुळे आपल्या देशातील कांद्याची निर्यात थांबल्याने या ठिकाणचा शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना पहावयास दिसत आहे. वास्तविक कांद्यांची निर्यात वाढविण्याची गरज होती जेणेकरून भारतीय शेतकरी स्थिरस्थावर झाला असता तर साहजिकच देशाचे अर्थचक्र बदलले असते.
COMMENTS