क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामिण भागातील का...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामिण भागातील काही गावांत या सर्पदंशाच्या घटनेमुळे बहुतांश प्रमाणात व्यक्ती दगावल्यादेखील आहेत.
जास्त प्रमाणात विषारी सर्पांचे दंश मागील काही दिवसांत झालेले असून यात काही व्यक्ती दगावलेल्या आहेत.
सरकारी दवाखाने व यावरील तज्ञ डॉक्टरांचाच सल्ला व उपचार घेत जावा.
खरं तर या वाढत्या सर्पदंशाच्या घटनांचा आलेख चढताच आहे, मात्र खबरदारी म्हणून सर्वांनी आपआपली काळजी घेत जावा, तसेच आपला आसपासचा परिसर स्वच्छ व वाढलेल्या गवतांवर औषधांची फवारणी करा जेणेकरून परिसरच साफसूफ राहिल.
सध्या उन्हाच्या तापी पडत असल्याने सर्पटणारे प्राणी हे बाहेर पडत आहेत, मात्र दिवस व रात्रीच्या वेळी व्यवस्थितरित्या वावर करत जावा असेच क्राईमनामा Live न्यूज नेटवर्कचे आवाहन राहिल.
COMMENTS