ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील राळेगण, बोतार्डे, शिंदे, आपटाळे, सुराळे, सोनावळे, भ...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील राळेगण, बोतार्डे, शिंदे, आपटाळे, सुराळे, सोनावळे, भिवाडे, आंबे हातवीज, इंगळूण या गावांमध्ये ढगफुटी सद्रृष्य पाऊस झाल्यामुळे येथील शेतकर्यांच्या शेती व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खरं तर दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम भागातील राळेगण येथील बबन आप्पा उंडे यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, या भागातील शेतीपिकांचे व शेतीचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी. अशीच येथील स्थानिक शेतकर्यांची मागणी आहे.
या गावांतील तलाठी ग्रामसेवक क्रृषी अधीकारी यांनी जागेवर जावुन प्रत्यक्ष पंचनामे करावेत कारण शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.
तरी शेतकर्यांना झालेल्या नुकसानीची वेळेत भरपाई मिळावी अशीच अपेक्षा.
COMMENTS