सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : दि. ७ भाद्रपद श्री गणेश चतुर्थी निमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र...
सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : दि. ७ भाद्रपद श्री गणेश चतुर्थी निमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गणेशोत्सव कालावधीत भाविक भक्तांची फार मोठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. श्री गिरजात्मजाच्या दर्शनाने व कृपाप्रसादाने कुटुंबातील व्यवसायातील व आयुष्यातील अडचणी, संकटे दूर झाल्याचे भावीक भक्त सांगतात.
या गणेशोत्सव कालावधीमध्ये भाविक आपल्या मनातील इच्छा मनोकामना नवस पूर्ण झाल्यामुळे श्री गिरजात्मजाच्या चरणाशी विविध स्वरूपात देणग्या देत असतात. आज शिरूर येथील होलसेल किराणा मालाचे व्यापारी गणेश भक्त श्री. विलास नेमिनाथ महावीर कर्नावट व सुरेश बोरा यांनी लेण्याद्रीच्या श्री गिरजात्मज गणपतीस नवस पूर्ण झाल्याने सव्वा किलो चांदीचा हार, घंटी व नारळ अर्पण केला.
त्याचप्रमाणे खेड येथील श्री. राजेंद्र सोपान काशीद यांनी दहा ग्रॅम सोने मूर्तीस अर्पण केले. मुंबई येथील श्री मनीष नारखेडे यांनी अन्नदानासाठी पन्नास हजार एक रुपयाची देणगी दिली. तसेच पुणे येथील श्री मोहित शिनकर व श्री समर्थ गायकवाड यांनी संपूर्ण एक दिवसाचे अन्नदान केले. अमेरिका येथील सौ विद्या जोशी रामा यांनी देखील पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात लेण्याद्रीला भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच अनेक भाविक आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण झाल्यामुळे देवस्थानला विविध स्वरूपात देणग्या देत असतात. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सचिव जितेंद्र बिडवई यांनी दिली. यावेळी विश्वस्त जयवंत डोके, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई उपस्तीत होते.
COMMENTS