औरंगाबाद: 'मला आय लव्ह यू म्हण नाहीतर तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावेल आणि व्हायरल करेल,' महिलेला अशी धमकी देणाऱ्या एका युवकावर क्रां...
औरंगाबाद: 'मला आय लव्ह यू म्हण नाहीतर तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावेल आणि व्हायरल करेल,' महिलेला अशी धमकी देणाऱ्या एका युवकावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन दाभाडे असे आरोपीचे नाव आहे.
सचिन याने महिलेसोबत जवळीक निर्माण केली होती. त्यानंतर वारंवार संपर्क साधून 'आय लव्हा यू म्हणाली नाहीस तर तुझे फोटो गल्लीतील मुलांच्या ग्रुपवर व्हायरल करेल' अशी धमकी दिली. फिर्यादी महिला ही विवाहित आहे. सचिन दाभाडे याने जवळीक साधून तिच्याकडून तुझ्या नवऱ्या विषयी तुला काही सांगायचे आहे असे सांगून व्हॉट्सअप क्रमांक इंस्टाग्राम, आयडी आणि पासवर्ड घेतला होता. त्यानंतर त्याने या महिलेली धमकी देण्याचे सत्र सुरू केले.
दरम्यान, सचिनच्या या कृत्यामुळे संतापलेल्या महिलेने तो नंबर ब्लॉक केला. पण सचिन इतर नंबरवरून फोन करून शिवीगाळ करू लागला. त्यामुळे अखेरीस या महिलेने क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सचिन दाभाडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS