लखनौ (उत्तर प्रदेश): दोघांना नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह झाला होता. पण, हुंडा आणि संशयावरून पत्नीला मारहाण करून खून केल्याची धक...
लखनौ (उत्तर प्रदेश): दोघांना नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह झाला होता. पण, हुंडा आणि संशयावरून पत्नीला मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे.
याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिसलगढी येथील गौरवचा विवाह 9 महिन्यांपूर्वी खोडा येथील टीना हिच्यासोबत झाला होता. दुसऱ्या मजल्यावर पत्नीसह राहत होता. तळमजल्यावर 2 भाऊ आणि आई-वडील राहत होते. गौरव व्यसनी असल्याचे लग्नानंतर समजले. दोघांमध्ये हुंड्यावरुन वाद होऊ लागले होते. भांडणामधूनच त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. मसुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी रवींद चंद पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव आणि टीनामध्ये वाद झाला होता. सोमवार (ता. 5) रोजी पहाटे 4 वाजता नशेत असलेल्या गौरवने बेसबॉलच्या बॅटने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने आरडाओरडा केला पण कुटुंबातील कोणी पुढे आले नाही. टीना बेशुद्ध पडल्यावर त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि घरातून पळ काढला.
पोलिसांनी गोविंदपुरम येथील उद्यानातून बेशुद्ध अवस्थेत गौरवला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सांगितले की, त्याचे लग्न 9 महिन्यांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये टीनाशी झाले होते. माझ्यापेक्षा ती धाकट्या भावाची ती खूप काळजी घेत होती. यामुळे टीनाचे आपल्यावर प्रेम नाही असे त्याला वाटत होते. टीनापासून वेगळे व्हायचे आहे. त्यासाठी तो 2 दिवसांपूर्वी घरातून पळून जयपूरला गेला होता. कुटुंबीयांनी तेथे पोहोचून रविवारी त्यांना तेथून घरी आणले. तो रात्रीच आला होता. अशी माहिती घरच्या व्यक्तींनी दिली. त्याने दारु प्यायली होती. त्याला वाटले की अशा प्रकारे आपण वेगळे होऊ शकणार नाही, म्हणून त्याने तिला मारण्याचा निर्णय घेतला. पहाटे चार वाजता त्यांचे डोळे उघडले. टीना झोपली होती. त्याला उठवून खोलीचा दरवाजा बंद करुन मारहाण केली.
बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर हल्ला केला. त्याला वाटले की तिचा श्वास अजून सुरु आहे. त्यानंतर त्याने गळा दाबून तिचा खून केला. घरातील लोकही आले होते. पण कोणी काही बोलले नाही. थोड्या वेळाने तो पळून गेला. टीनाच्या हत्येमध्ये वापरलेली बेसबॉल बॅट आणि ओढणी जप्त करण्यात आली आहे. पत्नीवर संशय असल्याने त्याने हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. याबाबत पोलिस तपास करत आहेत.
COMMENTS