ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली असून या रस्त्यावरून चाल...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली असून या रस्त्यावरून चालताना व वाहने चालवताना कसरतीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारांची खोलीची रूंदी व खोली न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून थेट शेतकर्यांच्या शेतात गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राळेगण येथील बबन आप्पा उंडे यांच्या शेतात हे पाणी घुसल्याने उंडे यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.
पश्चिम भागातील बेलसर ते भिवाडे या रस्त्याच्या मधील बोतार्डे, राळेगण तसेच काही रस्त्यांमधील पट्ट्यातील रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे.
बोतार्डे येथील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.
मात्र या भागातील रस्त्याच्या दोन्हीही बाजूची गटारे तुंबलेली असून गवत व झाडेझुडपे वाढलेलेली असून हि गटारे मातीने गाडली गेली आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी जायला मार्गिका नसल्याने हे पाणी थेट शेतकर्यांच्या शेतांत गेल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष असल्याने शेतकर्यांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्याला गटारे काढली नसल्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याने रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे.
आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीची दखल घ्यावी, अशीच स्थानिक नागरिक व वाहनचालक मागणी करत आहेत.
COMMENTS