पुणे : हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेतला आणि तिला रुग्णालयामध...
पुणे : हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेतला आणि तिला रुग्णालयामधून घेऊन जात असताना पाहिल्यानंतर दुसऱया मैत्रीणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिका हरिश्चंद्र भागवत (वय 19) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय 19) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे आहेत. शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
आकांक्षा व सानिका या दोघीही लहानपासूनच्या जिवलग मैत्रिणी होत्या. सारिका हिने राहत्या घरी सात वाजण्याच्या सुमारास साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सानिकाने गळफास घेतल्याचे कळताच कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत दार तोडून सारिकाचा मृतदेह खाली उतरवला. सारिकाचा मृतदेह पोलिस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात होते. सारिकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. सारिकाचा मृतदेह रुग्णावाहिकेमधून घेऊन जात असताना तिची मैत्रीण आकांक्षाने पहिले. मैत्रिणीने आत्महत्या केल्याचे समजताच तिला धक्का बसला. त्यानंतर आकांक्षाने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला आणि पाचव्या मजल्यावरन उडी घेतली आणि ती रुग्णवाहिकेजवळच पडली.
पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने आकांक्षाचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही मुलींच्या पालकांचा आक्रोश काळीज पिळवाटून टाकणार होता. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS