सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : आज गुरुवार दि. 29/09/2022 रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद माहे सप्टेंबर 2022( पुष्प ३...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : आज गुरुवार दि. 29/09/2022 रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद माहे सप्टेंबर 2022( पुष्प ३ रे) याचे आयोजन जि.प.प्राथ. शाळा वानेवाडी येथे करण्यात आले.
त्यानिमित्ताने उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. पुष्पलता पानसरे यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासंदर्भात नवीन उपक्रम शाळेत राबविण्यात यावेत तसेच माझा वर्ग माझी जबाबदारी यानुसार १००% विद्यार्थी प्रगत होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
आजच्या या शिक्षण परिषदेनिमित्ताने श्री.अन्वर सय्यद यांनी गणित-पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यांची गरज तसेच विद्यांजली पोर्टल 2.0 या संदर्भात पोर्टल विषयीचे स्वरूप व पार्श्वभूमी, कार्यपद्धती त्यात समाविष्ट विविध घटकांचे कर्तव्य व जबाबदारी त्याचे योगदान अटी व शर्ती तसेच त्याविषयीचे आचारसंहिता यांचे अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले .
त्याचप्रमाणे श्री. सुभाष मोहरे यांनी देखील भाषा- विषयातील पायाभूत साक्षरतेचा प्रवास पायाभूत साक्षरता म्हणजे काय याविषयी देखील विस्तृत असे मार्गदर्शन केले.
यानिमित्ताने पंचायत समिती जुन्नरच्या विषय तज्ञ श्रीमती. रोहिणी गडदे यांचे देखील मार्गदर्शन मिळाले.
तसेच यावर्षीचा पुणे जिल्हा परिषदेचा प्रथम गुणवंत शिक्षक पुरस्कार आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, शाळेचा कायापालट करणारे भौतिक सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे ,तंत्रस्नेही शिक्षक श्री. अन्वर सय्यद यांचा केंद्र उच्छिल च्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जुन्नर तालुक्याचे आमदार श्री. अतुलशेठ बेनके व श्री. शरदचंद्रजी माळी गटविकास अधिकारी जुन्नर आणि सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. हेमंत गरीबे तसेच गटशिक्षणाधिकारी सौं अनिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यात अतिउत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल सौ. पुष्पलता पानसरे व श्री बाळू कडू आणि श्री. सुभाष अरुण मोहरे यांना सन्मानीत करण्यात आले.
या शिक्षणपरिषदे निमित्ताने उपस्थित धालेवाडी शाळेचे मुख्या.श्री. हेमा सुपे व त्यांचे सहशिक्षक श्री. विठठल जोशी कालदरे शाळेचे श्री. दिपक विरणक व सह शिक्षक श्री. सागर भवारी शिवली शाळेचे श्री तुकाराम भालेकर आणि शैला भालेकर ,डामसेवाडी शाळेचे श्री. राजेंद्र तेली विरणकवाडी शाळेचे श्री. राजेंद्र खेत्री व सह शिक्षक श्री. बाळू करवंदे भिवाडे शाळेचे श्री . बाळू कडू व सहशिक्षिका सौ. स्मिता लोखंडे आंबोली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूनम तांबे व सह शिक्षक सौ. छाया अरगडे,श्रीमती. संगिता जाधव , श्रीमती.निशा साबळे मॅडम ,श्री. हेमा दिवटे तसेच उच्छिल शाळेचे सहशिक्षक सौ. स्मिता ढोबळे,सौ. लिलावती नांगरे,सौ. आरती मोहरे सर्वच उपस्थित राहिल्यामुळे सर्वांचे मनापासून आभार कार्यक्रमाचे नियोजन वानेवाडी शाळेचे मुख्याध्यापिका व सहशिक्षिका यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शोभा उंडे यांनी केले तर आभार सौ. माया शेळकंदे यांनी मानले. आजची ही शिक्षण परिषद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मा.सय्यद सर आणि मा. मोहरे सर यांनी मार्गदर्शन केलेला प्रत्येक घटक समजून घेऊन शंकानिरसन करुन आपल्या शाळेतील एकही विद्यार्थी अभ्यासात मागे राहणार नाही याची सर्वांना खात्री दिली. त्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या आश्वासन देखील या निमित्ताने देण्यात आले.
स्नेहभोजना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
COMMENTS