क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील खामगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यु इंग्लिश स्कूल खामगाव या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांच...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील खामगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यु इंग्लिश स्कूल खामगाव या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मागे शाळेत येत असताना दोन टू व्हिलरवर चार माणसे तोंड बांधून आल्याची प्रथम माहिती शालेय विद्यार्थ्यांनी सांगितली.
सदर प्रकार हा खामगाव या गावी घडल्याचे खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी जुन्नर पोलिस स्टेशनला या बद्दलचे निवेदन सादर करताना प्रसार माध्यमांना या बद्दलची माहिती दिली.
सदर इसम हे मुलांना खाऊ देतो, गोळ्या बिस्किट देण्याचे आमिष दाखवून मुलांना धमकावले असून या भितीपोटी विद्यार्थ्यांनी सदर ठिकाणाहून पळ काढत आरडाओरड केल्यानंतर सदर इसमांनी त्या ठिकाणावरून पलायन केल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
मात्र सदर बाब हि अत्यंत धक्कादायक असून या घटनेची स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून योग्य असा तपास करावा तसेच सदर इसमांनी अपहरणाच्या द्दष्टीने प्रकार केला असेल तर योग्य असा तपास करून त्वरीत अटक करण्यात यावे, तसेच तालुक्यातील नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहन घोलप यांनी केले आहे.
COMMENTS