सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : नॅशनल लेव्हल पोस्टर अँड मॉडेल प्रेझेंटेशन" मध्ये अनुष्का वाळकुंडे आणि सुचित्रा शे...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : नॅशनल लेव्हल पोस्टर अँड मॉडेल प्रेझेंटेशन" मध्ये अनुष्का वाळकुंडे आणि सुचित्रा शेळके अव्वल
ओंकार ढोमसे आणि सौरभ कडूसकर "इंटरनॅशनल इंडोमलेशियन कॉन्फरन्स" मध्ये द्वितीय
विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम व्हावा यासाठी समर्थ संकुला मध्ये नेहमीच विविध शैक्षणिक स्पर्धा,प्रश्नमंजुषा,पोस्टर स्पर्धा,क्रीडा स्पर्धा इ चे आयोजन केले जाते.तसेच तालुका,जिल्हा,राज्यपातळीवरील स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.
बारामती कॉलेज ऑफ फार्मसी,बऱ्हाणपूर या ठिकाणी नुकत्याच आयोजित केलेल्या "नॅशनल लेव्हल पोस्टर अँड मॉडेल प्रेझेंटेशन" स्पर्धेमध्ये "समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी" च्या अनुष्का वाळकुंडे आणि सुचित्रा शेळके या विद्यार्थिनींनी पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशन या दोन्हीही स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की व डॉ.संतोष घुले यांनी दिली.सदर विद्यार्थ्यांनी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थकेअर" या विषयावर पोस्टर सादर केले.मॉडेल प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये "वायरलेस ड्रग डिलिव्हरी" हे मॉडेल त्यांनी सादर केले.
तसेच ओंकार ढोमसे आणि सौरभ कडूसकर या विद्यार्थ्यांनी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई, बीड या ठिकाणी झालेल्या "इंटरनॅशनल इंडोमलेशियन कॉन्फरन्स" मध्ये "कम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन ऑफ फ्लोरफेनीकॉल" या विषयावर पोस्टर सादर केले होते. त्यामध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
सदर विद्यार्थ्यांना प्रा.सचिन दातखिळे, प्रा.राहुल लोखंडे, प्रा.सागर तांबे, प्रा.शितल गायकवाड, प्रा.शुभम गडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, विश्वस्त वल्लभ शेळके, प्रा.राजीव सावंत यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS