सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे (बांगरवाडी) आणि विघ्नहर्त...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे (बांगरवाडी) आणि विघ्नहर्ता मेडिकल फाऊंडेशन,नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जागतिक फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर वर्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम शास्त्रज्ञ व नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्स चे प्राध्यापक डॉ.किणी मंजुनाथा हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,खजिनदार तुळशीराम शिंदे,विश्वस्त वल्लभ शेळके,विघ्नहर मेडिकल फाऊंडेशन नारायणगाव चे संस्थापक,प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ व डब्ल्यू एच ओ चे सल्लागार डॉ.सदानंद राऊत,सिरम इन्स्टिट्युट नारायणगाव चे संस्थापक डॉ.मिलिंद खाडिलकर,रिसर्च सायंटिस्ट डॉ.गणेश पाटील,प्रा.राजीव सावंत,जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ सातपुते आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ.किणी मंजुनाथा हे आंतरराष्ट्रीय ख्याती चे संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत.अनेक प्रकारचे पेटंट,शोधनिबंध आणि पुस्तकांचे लेखन त्यांनी आजपर्यंत केलेले आहे.उत्तम संशोधनकार्य कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.संशोधन कार्यामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी,संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक हात पुढे येत असतात फक्त नवनिर्मितीची आस आणि ध्यास हवा असे प्रतिपादन यावेळी डॉ.किणी मंजुनाथा यांनी केले.अनेक प्रेरणादायी व समर्पक उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली.विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व विशद करत २१ व्या शतकामध्ये येणाऱ्या काळामध्ये औषधनिर्माण शास्त्र व जैवविज्ञानशास्त्र मध्ये कोणकोणत्या करियरच्या संधी उपलब्ध होणार आहेत याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ.सदानंद राऊत यांनी सर्पदंश झालेल्या व्यक्तींसोबतचे त्यांचे वैयक्तिक अनुभव त्यांचे उपचार आणि जीव वाचवण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय मदतीचे महत्त्व सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मागील शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व फार्मसी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कुलदीप वैद्य यांनी प्रास्ताविक इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की यांनी तर आभार कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी मानले.
COMMENTS