ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोतार्डे येथील बस थांब्याची अतिशय मोठ्या प्र...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोतार्डे येथील बस थांब्याची अतिशय मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले बस थांबे निक्रष्ट दर्जाचे झालेले असून या बस थांब्यातील बसण्याचे बाकडे मोडलेल्या अवस्थेत असून बस थांब्याचे शेडचे अक्षरश बांधकामातील गज दिसत आहेत.
या ठिकाणी प्रवासी व लहान मुलांचा जास्त प्रमाणात वावर असतो.
या बस थांब्याच्या दुरावस्थेमुळे नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करावी अशा प्रकारची मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करत आहेत.
COMMENTS