मुख्य संपादक:- प्रा.सतिश शिंदे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुका आर.पी.आय अध्यक्षपदी पोपट राक्षे यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी संपत...
मुख्य संपादक:- प्रा.सतिश शिंदे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका आर.पी.आय अध्यक्षपदी पोपट राक्षे यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी संपत गायकवाड यांची निवड करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांची जुन्नर तालुक्यात पक्षाच्या मेळाव्यानिमित्त भेट देत जुन्नर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने वाघमारे यांचे जुन्नर तालुका अध्यक्ष गौतम लोखंडे व तालुका पदाधिकारी यांच्या वतीने जंगी स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका आर.पी.आय. अध्यक्ष, सरचिटणीस, यांची निवड करत या पदांवर तालुक्यातील आर.पी.आय अध्यक्ष पदाची पक्ष आदेशानुसार तालुका कार्यकारणीची फेरनिवड केली. या तालुका कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी पोपट राक्षे यांची फेरनिवड करण्यात आली. व सरचिटणीस संपत गायकवाड यांची निवड करण्यात आली.
सुर्यकांत वाघमारे म्हणाले की, या तालुक्यातील अध्यक्षपदाची निवड आज रोजी पोपट राक्षे यांची तर सरचिटणीसपदी संपत गायकवाड व जिल्हा कार्यकारणीमध्ये अध्यक्ष गौतम लोखंडे यांच्या नावाची वर्णी जिल्हा कार्यकारीणीत लावण्यात आली आहे तर तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्याकडील हे पद तसेच ठेवण्यात आले आहे. तर जुन्नर तालुक्याचे युवा अध्यक्ष मंगेश गायकवाड यांच्या नावाची वर्णी युवा जिल्हा कार्यकारीणीत लावण्यात आली. तर महिला कार्यकारीणी व तालुका युवा अध्यक्ष नंतर घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचा सत्कार करत कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS