सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : मंगळवार दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : मंगळवार दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मजास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पावसाच्या रीमझीम सरी झेलत व डोंगरावरील धुक्याच्या वातावरणाचा आनंद घेत दिवसभरात हजारो भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतला. यामुळे लेण्याद्री परीसरास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५.०० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त कैलास लोखंडे व जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी देवस्थानचे खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, भगवान हांडे, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ६ वाजता दुपारी १२:०० वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवस्थानच्या वतीने व अर्पण ब्लड बॅंक, संगमनेर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. स्वकाम सेवा मंडळ, आळंदी देवाची यांचे १४ सदस्यांनी लेण्याद्री परिसरातील साफसफाई करुन आपली सेवा दिली. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादीक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे भजन झाले. रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर शिरोली येथील अव्दिक राहुल हाडवळे व आळे येथील तेजल अविनाश घोलप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
COMMENTS