सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : नारायणगाव येथील दाम्पत्य सौ.अक्षदा व प्रसिद्ध वक्त्ये प्रा.रतीलाल बाबेल गेल्या नऊ वर...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : नारायणगाव येथील दाम्पत्य सौ.अक्षदा व प्रसिद्ध वक्त्ये प्रा.रतीलाल बाबेल गेल्या नऊ वर्षांपासून घरगुती पर्यावरणपूरक गणपती बसवत असून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यावर्षी" 24 तीर्थंकर यांची माहिती सारांश रूपाने मांडली आहे.यात त्यांचा जीवनपट, त्यांचा फोटो आहे, हा फोटो टाकाऊ पुठ्ठा आणून योग्य मापाचा कापून त्यावर फोटो चिटकविले आहे. जैन धर्मातील 24 तीर्थंकर यांना केवलज्ञानप्राप्ती वेगवेगळ्या वृक्षांखाली झाली जसे साल, आंबा, अशोक, तेंदु, पिंपळ .या सारख्या अनेक वृक्षांचे जतन व्हावे हाच संदेश त्यांनी मानवाला दिला आहे. हा संदेश या देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची चिन्हे बैल, हत्ती, घोडा, माकड, चकवा, रक्तकमल, स्वस्तिक, चंद्रमा, मगर, श्रीवत्स, गेंडा, महेश ,डुक्कर ,वज्र ,हरीण ,बकरा, नंदावर्त ,कलश ,कासव ,नीलकमल, शंख, नाग व सिंह आहेत. या प्रत्येक चिन्हाने आपल्याला खूप सारी शिकवण दिली आहे. जीवनात श्रम सर्वश्रेष्ठ आहे. श्रमाला महत्त्व आहे. चंचल मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसारामध्ये प्रेम आणि निर्लपता असली पाहिजे. ज्ञानाने अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करता येतो .मनुष्य जीवन नश्वर आहे. विषय वासनाच्या स्वाधीन न राहता सावध राहिले पाहिजे. आळस सोडून दिला पाहिजे. सदगुणांचा स्वीकार केला पाहिजे .वज्राप्रमाणे कठीण शरीर बनविले पाहिजे .अचानक प्रेम, दया ,सहानुभूती दाखवण्याऱ्यापासून सावध राहिले पाहिजे. ओजस्वी वाणी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या कर्माचे सिंहाप्रमाणे सिंहावलोकन केलं पाहिजे, अशा प्रकारच्या शिकवणी या चिन्हांमधून आपणाला मिळत आहे .तसेच भारतीय झेंड्याचा इतिहास सन 1906 ते 1947 पर्यंतचा मांडला आहे .लोकमत मधील सदर, संस्कारधन आई प्रिंट काढून मांडले आहे . गणपती दर्शनाला येणाऱ्याने ते वाचावे ही इच्छा आहे.गेल्यावर्षी जुन्नर तालुका पर्यटन विकास संस्थेच्या मार्फत घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून तयारीला सुरुवात केली असून माळा, फुले दुकानातील आणलेल्या कागदापासून तयार करण्यात आली आहेत.गणपती बाप्पाचे मखर घरी बनविले आहे,पाठीमागे काड्या वापरून कापसाचा पर्वत उभा केला आहे.भारतीय झेंड्याचा इतिहास स्पष्ट होण्यासाठी 63 square फूट रांगोळी काढली आहे.खुल्या गटासाठी रांगोळी स्पर्धा ठेवली असून यातून सामाजिक प्रबोधन होणार आहे असे विषय दिले आहेत.
--दररोज सायंकाळच्या आरती साठी समाजातील एका दांपत्याला बोलवून त्यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. त्यांना भेट म्हणून एक वैचारिक पुस्तक देण्यात येतआहे.
सजावटीसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी दुकानातील आणलेल्या कागदांपासून तयार केल्या आहेत.पूर्णपणे पर्यावरण पूरक गणपती गेली 9 वर्षे बाबेल परिवार साजरा करीत आहे.
COMMENTS