सहसंपादकः-प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , बेल्हे (बांगरवाडी) या अभिय...
सहसंपादकः-प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज
ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट
ड्राईव्ह २०२२ अंतर्गत बँगलोर येथील प्रेशियन टेक्नॉलॉजी व करिअर लॅब्स यांच्या
माध्यमातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स
अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर
इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र
राज्याचे विभागीय प्रमुख अमित पिंगळे आणि पूणे विभागाचे प्रमुख मनोज पडघन यांनी
एप्टीट्यूड टेस्ट व पर्सनल इंटरव्यू आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बँगलोर येथून
थेट विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील
मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन
इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागातून
१० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुढील प्रमाणे:
मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील दिपक पोखरकर, सिव्हिल
इंजिनिअरिंग मधील प्रथमेश बालोडे, विहंग घोलप, शुभम मघाडे,
विशाल
शिंदे व सुशांत कांदळकर यांची तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील वैष्णवी घाडगे,
रागिणी
जगताप, समाधान भोसले व अतुल देशमुख यांची सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून निवड
करण्यात आली.
या विद्यार्थ्यांना ४ लाख रु. चे वार्षिक पॅकेज देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी
प्रा. प्रदिप
गाडेकर यांनी दिली.
या मुलाखती घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास,
संवाद
कौशल्य, जनरल बिहेवियर, बॉडी लँग्वेज तसेच तांत्रिक ज्ञान या
गोष्टींचा विचार करण्यात आल्याची माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन
पोखरकर यांनी दिली. या
प्लेसमेंट ड्राईव्ह साठी प्रा.अमोल खातोडे, प्रा.प्रवीण
सातपुते, प्रा.निर्मल कोठारी, प्रा.स्नेहा शेगर, प्रा.रामेश्वर
डोखे, प्रा.अमोल भोर, प्रा.विपुल नवले यांनी विशेष प्रयत्न
केले.
मुलाखतीनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात आले. सर्व यशस्वी
विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली
शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, विश्वस्त
वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
COMMENTS