रांची (झारखंड): शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याचे सर्वांना माहित असते. पण, येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून शिक्षा द...
रांची (झारखंड): शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याचे सर्वांना माहित असते. पण, येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून शिक्षा दिली आहे. नववीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांना दोषच दिला नाही, तर त्यांना झाडाला बांधले आणि शिक्षा म्हणून मारहाणही केली.
या घटनेचा
व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तिघांना झाडाला बांधण्यात आले आहे. काही विद्यार्थी या शिक्षकांशी बाचाबाची करत आहेत. दोघा विद्यार्थ्यांच्या हातात दांडकेही दिसत आहे. ते विद्यार्थी हातात दंडुका घेऊन झाला गोल गोल फेऱ्या मारताना दिसत आहेत. गणवेशातील इतर विद्यार्थी या ठिकाणी गोळा झाले आहेत. काही विद्यार्थी सदर घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1564879467264495616?s=20&t=_t_clFL8zCV9KrdzOqvp2w
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मारहाण केली. या मारहाणीचं कारण जेव्हा समोर आलं, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. परीक्षेत नापास झाल्यामुळे शिक्षकांना मारहाण करण्यात आली असल्याचं वृत्त ANI वृत्त संस्थेने दिले आहे. एकूण 36 विद्यार्थी नववीच्या प्रॅक्टीकल परीक्षेला बसले होते. त्यापैकी 11 विद्यार्थी नापास झाले. सोमवारी गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकासह शाळेतील दोघा कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी पकडले आणि झाडाला बांधले. यानंतर मारहाण केली. यात शिक्षक कुमार सुमन जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS