सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : नवरात्र म्हणजे शक्तीचे रूप. स्त्री शक्तीचा सन्मान महाराष्ट्रात या नऊ दिवसात वेगवेगळ्य...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : नवरात्र म्हणजे शक्तीचे रूप. स्त्री शक्तीचा सन्मान महाराष्ट्रात या नऊ दिवसात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. देवीच्या नऊ रूपाची पूजा आपण करतो पण आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपणांस आपल्या घरातच सापडतात. आई, आजी, बहिण, नणंद, भावजय, काकू, पत्नी ही रोजच्या जीवनातील देवींची ही वेगवेगळी रुपेच आहेत.
सौ अक्षदा बाबेल व श्री रतिलाल बाबेल हे उभयतां गेल्या नऊ वर्षापासून समाजातील गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व जीवनोपयोगी वस्तू देऊन नवरात्री सण साजरा करीत आहे. यावर्षी ही समाजातील 10 गरजू विद्यार्थिनींना रंगीत ड्रेस व वैज्ञानिक पुस्तक देऊन हा उत्सव साजरा करीत आहे. या दुर्गाची निवड करताना प्रा. सुभाष दुबळे सर यांची मोलाची मदत झाली. त्या 10 दुर्गाच्या चेहऱ्यावरील समाधानाने मनाला खूप आनंद मिळतो. वेगळे, चांगले करण्यास प्रेरणा मिळते असे अक्षदा बाबेल यांनी सांगितले. इतरांना दिलेले सुख नकळत परत आपल्या जीवनात येते हा निसर्गाचा अटळ नियम आहे.
खा, प्या आणि मजा करा या आसुरी वृतीवर विजय मिळविण्याचे हे नऊ दिवस असतात. भारतीय संस्कृती आणि सणवार आपल्याला दातृत्वाची भावना शिकवितात, ते जोपासने म्हणजेच सण खऱ्या अर्थाने साजरे करणे होय. आई गुलाबबाई बाबेल म्हणायची आपण समाजाचे देणे लागतो, ते कधीही विसरायचे नाही.
नवरात्रीमध्ये स्त्रीशक्तीला देवी म्हणून तिची मूर्तीपूजा केली जाते...
आम्ही सुद्धा स्त्रीशक्तीचीच पूजा या नवरात्रीमध्ये करीत आहोत, पण आमची मूर्ती ही हाडामांसाची आहे ...!
नवरात्रीतला "नव" हा शब्द आमच्यासाठी "नऊ" असा नसून, "नवीन" आयुष्य निर्माण करणारा आहे ! तुमच्या ही जीवनात नवीन आयुष्य निर्माण करणारा होवो हीच सदिच्छा.
COMMENTS