प्रतिनिधी : सचिन भोजने ( शिवव्याख्याते ) साकोरी येथील बेल्हेश्वर ज्ञान मंदिर येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
प्रतिनिधी : सचिन भोजने ( शिवव्याख्याते )
साकोरी येथील बेल्हेश्वर ज्ञान मंदिर येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्नवेध अनाथालयाचे संस्थापक शिवव्याख्याते सचिन भोजने हे होते.
याप्रसंगी स्व.शिवाजी भाईक युवा ग्रुप, बंड्या ग्रुप बैलगाडा संघटना, सिध्दार्थ गोफणे, संतोष भालेराव (सर), गणेश साळवे (पोस्टमन), सुजित घनदाट (बिल्डर), योजना आरुडे(शालेय समिती उपाध्यक्ष), अक्षय भंडलकर, आदि मान्यवर उपस्थित होते. शिवव्याख्याते सचिन भोजने यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे जीवन चरित्राबद्दल विद्यार्थ्यांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहण्यास मिळाले. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आभार मानत समाजामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे व ते मार्गदर्शन आज जयंतीच्या निमित्ताने मिळाले असे मत व्यक्त केले.
COMMENTS