सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर म...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर मधील जेष्ठ विज्ञान शिक्षक रतीलाल बाबेल यांना शिक्षक दिनी दोन संस्थांचे राष्ट्रीय व एक जिल्हास्तरीय असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
हायपेज मीडिया, जयपुर यांच्यामार्फत इंडिया एज्युकेशन अवॉर्ड 2022 , इनायत ब्लेसिंग फाउंडेशन,उत्तर प्रदेश यांच्यावतीने "राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार 2022 "तसेच तसेच रोटरी क्लब नारायणगाव ,हायवे व विघ्नहर मेडिकल फौंडेशन यांच्या वतीने" गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022" असे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.यातील दोन पुरस्कार आभासी पद्धतीने व एक पुरस्कार प्रत्यक्ष नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्रात स्वीकारला आहे.
रतिलाल बाबेल हे गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव येथे तीस वर्षापासून गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करीत असून निकालाची उत्कृष्ट परंपरा त्यांनी राखली आहे. ते जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष असून शिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, शिक्षकांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, शैक्षणिक सहलीचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजनामध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना झाला असून अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनात पारितोषिके मिळाली आहेत .
वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी स्वर्गीय रामचंदची बाबेल ट्रस्टची स्थापना करून तळागाळातील प्रसिद्धी पराडमुख असणाऱ्या अनेक व्यक्तींना समाजासमोर आणण्याचे काम केले असून त्यांना ज्ञान प्रेरणा, समाज प्रेरणा, विज्ञान प्रेरणा ,संस्कार प्रेरणा, दुर्गप्रेरणा असे विविध पुरस्कार दिले आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांनी मोफत प्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांचे अनेक जादूचे कार्यक्रम घेतले आहेत. विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने मोफत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून शाळा पातळी, शिक्षक व ग्रामस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
:-रोटरी क्लब नारायणगाव, हायवे यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निवृत्त सचिव आदरणीय शहाजी ढेकणे साहेब यांच्या हस्ते व ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे ,कार्याध्यक्ष कृषी रत्न अनिलतात्या मेहेर, रोटरी हायवेचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांच्या उपस्थितीत स्वीकारताना सामाजिक कार्यकर्ते प्रा.रतिलाल बाबेल.
COMMENTS