आरोग्य टिप्स : कोवळे ऊन हा विशेषतः व्हिटॅमिन डी चा महत्वपूर्ण स्त्रोत आहे. मात्र पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सकाळचे कोवळे ऊन खूप कमी वेळ...
आरोग्य टिप्स : कोवळे ऊन हा विशेषतः व्हिटॅमिन डी चा
महत्वपूर्ण स्त्रोत आहे. मात्र पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सकाळचे कोवळे ऊन खूप
कमी वेळा असते. त्यामुळे पावसाळ्यात व्हिटामिन डी मिळण्यासाठी आहारात खालील
पदार्थांचा समावेश करा.
दूध
दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. व्हिटॅमिन
डी मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित दूध अवश्य प्यावे.
कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. मात्र याचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानेच करावे.
मशरुम
मशरुम्समध्येही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.
सोयाबीन दूध
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. ज्या लोकांना दूध आवडत नाही ते सोयाबीनचे दूध, सोयाबीन पनीर (टोफू) खाऊ शकतात.
संत्री
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.
गाजराचा रस
गाजराच्या रसमध्येही व्हिटॅमिन सी आणि
डी आढळते. गाजराचा रस नियमित पिल्याने रक्तही वाढते.
COMMENTS