आरोग्य टिप्स - पचन आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. सगळ्या प्रकारच्या डाळी , मका , बीन्स , ब्रोको...
आरोग्य टिप्स - पचन आणि आरोग्य चांगलं
रहावं यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. सगळ्या प्रकारच्या डाळी, मका, बीन्स, ब्रोकोली, मटार, भात, केळ, गाजर, ओट्समिल, सुकामेवा, नारळ, यांसारख्या
पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण आधी असते. जाणून घ्या फायबरयुक्त पदार्थ खाण्याचे
फायदे –
फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच फायबरयुक्त आहाराचं अधिक सेवन केल्याने कॅलरीज कमी होऊन वजन घटण्यास मदत होते.
कॉलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते
सोल्युबल फायबर रक्तातील कॉलेस्ट्रॉलच्या स्तरालाही कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहते.
पोटाचे आरोग्य सुधारते, त्वचा निरोगी राहते
फायबरयुक्त पदार्थ हे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. त्वचा निरोगी राहते.
पचनसंस्था सुरळीत राहते
आहारातील फायबरमुळे पोटाच्या संदर्भातल्या समस्या, बद्धकोष्ठाच्या
समस्येपासून सुटका होते. तसेच पचन चांगलं होतं.
COMMENTS