आरोग्य टिप्स: अनेकांना वजन वाढल्याने चिंता लागते. मग ते कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का यावर एक सोप्पा अ...
आरोग्य टिप्स: अनेकांना वजन वाढल्याने चिंता लागते. मग ते कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का यावर एक सोप्पा असा उपाय आहे. तो म्हणजे मनुके खाण्याचा. दररोज पाण्यात भिजवून मनुके खा. त्यामुळे वजन कमी होते.
त्यासाठी रात्री झोपताना काही मनुके घ्या. ते थंड पाण्यात भिजत ठेवा. रात्रभर ते तसेच राहू द्या. नंतर सकाळी उठल्यानंतर ते मनुके पाण्यातून काढा. मग रिकाम्या पोटी ते खा. त्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात.
भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे
– पचनसंस्थेचा त्रस्त होत असेल तर मनुके खावीत.
– ज्या लोकांना त्वचेची समस्या आहे अशा रुग्णांनी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यावे. त्यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते.
– भिजवलेले मनुके नियमित खाल्ल्यास डोळे निरोगी होऊ शकतात.
– केस गळती वा केस तुटणे अशा समस्या असतील तर भिजवलेले मनुके खा. त्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. शिवाय केसांची चमक वाढते.
COMMENTS