सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांस हर घर तिरंगा या शासनाच्या योजनेअंतर्गत शाळा पातळीवर विविध प्रकारच्या स्पर्धा, माजी विद्यार्थी यांसकडून क्रीडा साहित्याचे वाटप , शाळेसाठी वै. बायजाबाई किसन नवले यांच्या स्मरणार्थ श्री. सचिनभाऊ नवले, श्रीं बाळासाहेब नवले , श्री. उमेशभाऊ नवले आणि श्री सुरेशभाऊ नवले यांच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्काराचे आयोजन, श्री. संदेशभाऊ नवले यांच्याकडून सर्व शाळेतील मुलांना खाऊचे वाटप तसेच कु. शिवांश सचिन नांगरे या बाळाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्ताने शाळेसाठी पाच भिंतीवरील घड्याळे व खाऊ देण्यात आला असून पेसा ग्रामपंचायत उच्छिल यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उच्छिल आणि ग्रामदैवत श्री क्षेत्र केदारेश्वर मंदिर परिसरात विविध प्रकारची सुंदर, आर्कर्षिक व सुभोभित अशी वृक्षलागवड करण्यात आली असून बोलक्या भिंती व समूह साधन केंद्र इमारत दुरुस्ती याकरीता 75000/- रुपयांचा निधी तर शौचालय दुरुस्ती साठी विशेष योगदान देणाऱ्या नूतन ग्रामसेविका सौ. साबळे मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला. तर पेसा ग्रामकोष समिती उच्छिलचे अध्यक्ष श्री. पोटे आणि सदस्या सौ मंदाताई बगाड तसेच या सर्वाचे क्षेय देणारे गावचे पोलीस पाटील श्री सुनिल बगाड यांचेही आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षस्थानी उच्छिल गावाचे तरुण तडफदार युवा उद्योजक श्री.संदेशभाऊ नवले हे होते तर शाळेचे ध्वजारोहन शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शरद नवले यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजाला पुष्पहार श्री.गणपत बांबळे मा.चेअरमन उच्छिल सोसायटी यांनी अर्पण केले तर श्रीफळ श्री.बबन केंगले नूतन चेअरमन यांच्या हस्ते केले.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांचे ध्वजारोहन श्री सुनिल बगाड पोलीस पाटील यांच्या हस्ते झाले तर पुष्पहार अर्पण श्री. नितीन भालेराव, सौ. अर्चनाताई शिंदे ग्रामपंचायत सदस्य तर श्रीफळ श्री बापूनाना नवले संचालक , श्री एकनाथ नवले व श्री हरिभाऊ शिंदे यांच्या हस्ते झाले.
ग्रामपंचायत कार्यालय उच्छिल येथील ध्वजारोहण श्री बबन मारुती नवले यांच्या हस्ते करण्यात आले. तर पुष्पहार अर्पण श्री विलास नारायण नवले यांच्या हस्ते झाले. श्रीफळ श्री शांताराम शिंदे यांनी वाहिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेमध्ये बालसभा आयोजित करण्यात आली होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष मोहरे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांनी सुरेख भाषणे केली तर तालुकात्सर स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव सन 2022 मध्ये सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठा गटात द्वितीय क्रमांक आल्याबदल सर्वांनी कौतुक व त्याचा सत्कार करण्यात आला. यानंतर मनोगतात श्री. सुरेश नवले, श्री शरद नवले , सौ. साबळे मॅडम ग्रामसेविका सौ. पुष्पलता पानसरे केंद्रप्रमुख उच्छिल आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदेशभाऊ नवले यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले शाळेविषयी गौरवोध्वार काढले आणि सर्वांना स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानिमित्ताने संगणक लॅब साठी निधी 125000/- इतका ठेवण्यात आला तर नव्याने तयार करण्याकरीता लिलावातून 50000/- रुपये निधी शाळेसाठी रोख स्वरूपात देण्यात आला तर शाळेतील श्री अन्वर सय्यद श्री सुभाष मोहरे सौ स्मिता ढोबळे सौं लिलावती नांगरे आणि सौ आरती मोहरे या पाचही शिक्षकांच्या वतीने प्रत्येकी पाच प्रमाणे 25000/- रुपये देण्यात आला असून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीं शरद नवले यांच्या वतीने 7001/- रुपये जाहिर करण्यात आले तर उर्वरीत रक्कम शाळेतील माजी विद्यार्थी गावातील मान्यवर यांना आवाहन केले गेले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याकरीता श्री चंदकांत शिंदे व सौ अर्चनाताई शिंदे यांच्या वतीने सन्मानचिन्ह देण्याचे जाहिर करण्यात आले.
या निमित्ताने ज्या सन्माननीय मान्यवरांची शाळेसाठी विशेष योगदान आहे अशा व्यक्तीमध्ये श्री संदिप नवले श्री रोहिदास भालेराव श्री सोमनाथ केंगले यांचाही सत्कार केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री रामदास बाबजी नवले शिक्षणप्रेमी सदस्य तर श्री गणपत भालेराव उपाध्यक्ष , सदस्य श्री रविंद्र भालेराव श्री संपत नवले श्री सचिन नवले सौ कांचन नवले सौ सविता नवले सौ रेश्मा केंगले सौ शोभा नवले सदस्या शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तसेच गावातील प्रमुख पाहुणे श्री जगदिश नवले मा अध्यक्ष श्री सागर बांबळे श्री प्रविण नवले श्री निलेश नवले श्री सावकार नवले श्री. मयूर शिंदे श्री कुंदन बगाड श्री बबन नवले श्री लक्ष्मण बगाड श्री आत्माराम शिंदे श्री विठल नवले श्री सुभाष आढारी श्री जयानंद नवले श्री. तान्हाजी नवले श्री सुनिल नवले श्री विकास शिंदे श्री किशोर नवले श्री अशोक भालेराव अंगणवाडी सेविका सौ. संगिता शिंदे ताई व मदतनीस योगिता केंगले आदी मान्यवर तरुण मंडळ उपस्थित होते.
तसेच सौ डॉ. सुप्रिया कानडे वैद्यकिय अधिकारी आरोग्य उपकेंद्र आरोग्य सेविका सौ सुनिता भागवत व तंबाकुची प्रतिज्ञा देऊन उपस्थित सर्वांना प्रेरित करणारे आरोग्य सेवक श्री विवेक अत्रे आणि मेमाणेबाई व शिर्केबाई उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या दरम्यान सर्वांना चहापाणी करणाऱ्या श्रीम नूतन साबळे व सौ विमल करवंदे सौ शांताबाई नवले यांचेही अनमोल सहकार्य लाभले शेवटी गोड आभार श्री सय्यद सर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् होऊन शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात येऊन कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS