सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे (ब...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे (बांगरवाडी) अंतर्गत प्रथम वर्ष प्रवेशित बी सी एस, बी बी ए व बी कॉम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे करण्यात आले होते.
जी एम आर टी खोडद, पुणे येथील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.जे के सोळंकी साहेब यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,खजिनदार तुळशीराम शिंदे,विश्वस्त वल्लभ शेळके, बी सी एस चे प्राचार्य डॉ लक्ष्मण घोलप,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर, प्रा.संजय कंधारे आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ जे के सोळंकी साहेब म्हणाले कि, आव्हान स्वीकारुन स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायलाच हवे.
जगाशी संवाद साधायचा असेल तर इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
एखादं काम करताना अशा प्रकारे करा कि ज्याने आपली वेगळी ओळख निर्माण होईल आणि ओळख अशी निर्माण करा कि ज्याने आपले प्रत्येक काम होईल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर आपण मजबूतपणे उभे राहिलो तर मजबूर होण्याची वेळ येणार नाही. नियोजन आणि व्यवस्थापन महत्वाच्या बाबी असून ते एक कौशल्य आहे. ज्ञानाचे कौशल्यामध्ये रूपांतर करण्याचे सामर्थ्य हे आत्मविश्वासाने येते.आपली तुलना कधीही इतरांशी करू नका.
मूल्याधिष्ठित व मूल्यवर्धित शिक्षण हि काळाची गरज असून त्यासंदर्भात समर्पक दाखले देऊन स्पष्टीकरण दिले.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रवेशित गुणवान विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गौरी भोर यांनी, प्रास्ताविक विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी तर आभार प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा.अमोल काळे, प्रा.गणेश बोरचटे यांनी अथक परिश्रम घेतले.
COMMENTS