क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील अति दुर्गम भागातील व ग्रामीण भागातील दिव्यांग म्हणून अनेक लोकांना ऑनलाईन प्रमाण पत्र म्हणजे काय याची...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील अति दुर्गम भागातील व ग्रामीण भागातील दिव्यांग म्हणून अनेक लोकांना ऑनलाईन प्रमाण पत्र म्हणजे काय याची माहिती नव्हती व गेल्या 12/13वर्षापासून दिव्यांग लोकांना मिळणार्या शासनाच्या योजना पासुन दिव्यांग वंचित रहात होते अश्या लोकांना प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण व अरूण शेरकर अध्यक्ष, व कार्यकर्ता यांनी दुर्गम भागात गावागावात जावून माहिती विचारली व तेव्हा 40ते 50जण ऑनलाईन प्रमाण पत्र व शासनाच्या विविध योजना पासुन वंचित रहात होते या लोकांना शासनाच्या विविध योजना ची माहिती देण्यात आली व सर्व लोकांना ऑनलाईन प्रमाण पत्र करीता रजिस्टर करून घेतले व यात काही दिव्यांग लोकांना पुणे औंध जिल्हा रूग्णालयात 3/8/22 व काही मंचर ग्रामीण रूग्णालयात 5/8/22या तारखेला तपासणी करीता घेऊन जाण्यासाठी दिव्यांग लोकांना वर्गणी गोळा करून जाण्याची व्यवस्था केली व औंध जिल्हा रूग्णालयात चे वैद्यकीय अधिकारी व मंचर ग्रामीण रूग्णालयात अधिकारी यांच्या शी संपर्क करून जुन्नर तालुक्यातील लोकांना पुणे शहराची रस्ते माहिती नसल्याने व तेथे रूग्णालयात सकाळी लवकर जावून तपासणी करीता नंबर लावावा लागतो तरीसुद्धा लवकर नंबर येत नाही व पुन्हा जुन्नर ला येण्यासाठी रात्री उशिरा गाडयांची सोय नसल्याने दिव्यांग लोकांना मानसिक व शारीरिक त्रास दिव्यांग होतो या लोकांची वैद्यकीय अधिकारी याच्याशी चर्चा करून या लोकांना ऐकाच दिवशी तपासणी करून ऑनलाईन प्रमाण पत्र मिळून देण्यात आले या वेळी औंध जिल्हा रूग्णालय व मंचर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी याची मोलाची मदत झाली
तपासणी झालेले ऐकून 35दिव्यांग लोकांना त्यांचे वाटप ऑनलाईन प्रमाण पत्र वाटप करण्यात आले ऑनलाईन प्रमाण पत्र दिव्यांग लोकांना त्यांच्या हातात मिळाल्यावर दिव्यांग लोकांनच्या चेहरा आनंदी दिसत होता .
या वेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण ,अरूण शेरकर अध्यक्ष, दत्तात्रय हिवरेकर गुरूजी कार्याध्यक्ष, गणेश गुंजाळ, श्रीकांत जाधव, सत्यवान साळवे, तबाजी आरोटे, भानुदास घोलप, ज्योती पाद्रे, पुष्पा जंगम, गुलाम पिंजारी, हरशाज पिंजारी, कमल शेटे, प्रकाश चव्हाण,ज्ञानेश्वर गाडेकर, मिना कुराडे, मिसबा बेपारी, सागर चव्हाण व दिव्यांग बांधव व पालक उपस्थित होते.
COMMENTS