पुणेः डबल मर्डर मध्ये ०७ महिन्यांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोणीकंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पोलिस पुढील तपास ...
पुणेः डबल मर्डर मध्ये ०७ महिन्यांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोणीकंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं.२० / २०२२ भादंवि कलम ३०२,३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, २०१, १२० (ब), आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५) सह मोका कलम ३ (१) (7), ३ (२), ३(३), ३ (४) मधील फरारी आरोपी माऊली ऊर्फ केतन रामदास कोलते (वय २८ वर्षे रा. मु.पो. बकोरी ता. हवेली जि. पुणे) याचा शोध घेवून दाखल गुन्ह्यात ताब्यात घेवून समक्ष हजर करणे बाबत वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे लोणीकंद तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक सुरज किरण गोरे तसेच पोशि समीर पिलाणे यांनी त्यांचे खास खबऱ्यांना आरोपी बाबत माहिती देवून रवाणा केले होते.
सदर आरोपी बीड येथे आपले लपून रहात असले बाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने बीड येथे खाजगी वाहनाने जाऊन माहितीची शहानिशा केली. सदर आरोपी सहयोग नगर येथील श्री क्षणमुखी हनुमान मंदिराजवळ आरती बिल्डींग बाहेर बीड येथे शेवरलेट कार नंबर एमएच १२ ईजी ७७५१ यामधून येणार असल्याची माहिती समजली होती. पोउपनि सुरज गोरे यांची टिम सहयोग नगर येथे सापळा लावला. कार नंबर एमएच १२ ईजी ७७५१ हि येवून थांबली. मिळालेल्या वर्णनाप्रमाणे तो गाडीत दिसताक्षणी पोउपनि सुरज गोरे यांचे टिमने त्यास ताब्यात घेतले. पुढील तपासकामी सहा. पोलिस आयुक्त किशोर जाधव येरवडा विभाग पुणे यांचे ताब्यात दिले असून पुढील तपास सुरु आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलिस उपआयुक्त परीमंडळ-०४ रोहीदास पवार, सहा. पो. आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव लोणीकंद पोलिस स्टेशन वपोनि गजानन पवार, पोनि गुन्हे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सपोनि गजानन जाधव, निखिल पवार, पोलिस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोहवा बाळासाहेब सकाटे, पोना कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, पो.अं. समीर पिलाणे, दिपक कोकरे, पांडुरंग माने, अमोल ढोणे, साई रोकडे यांनी केली आहे.
COMMENTS