सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर - ता. २६ ऑगस्ट २०२२ डोंगरावर असलेल्या गिरिजात्मजाचे दर्शन.. आता रोप वे किंवा लिफ्ट बसने जा...
सहसंपादकः-
प्रा. प्रविण ताजणे ( सर ) 
जुन्नर - ता. २६ ऑगस्ट २०२२
डोंगरावर असलेल्या गिरिजात्मजाचे दर्शन.. आता रोप वे किंवा लिफ्ट
बसने जाऊन करता येईल असे प्रयत्न सुरु आहेत. या साठी मेट्रो कंपनी सह आणखी एका
कंपनीबरोबरच चर्चा झाली आहे. खासदार तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांच्याशी बैठक करून,
त्याला
मूर्त स्वरूप येईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी
लेण्याद्री येथे सांगितले.
गणेशोत्सव काळात लेण्याद्री येथे भाविकांसाठी सुविधांविषयी बैठकीत ते
बोलत होते.. 
गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही. त्यामुळे
यावर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होण्याची शक्यता असल्याने, कुठेही
भाविकांना अडचणी येऊ नयेत म्हणून आयुष प्रसाद यांनी जुन्नर तालुक्यातील सर्व
अधिकाऱ्यांची एक बैठक लेण्याद्रीच्या मीटिंग हॉलमध्ये आयोजित केली होती. त्यामध्ये
तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी,
उपविभागीय
पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, तालुका
आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ, महिला बालकल्याणच्या निर्मला कुच्छीक,
लेण्याद्री
देवस्थानचे विश्वस्त व गोळेगावचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात वाहनतळ, शौचालय, पाणी
आणि आरोग्य या सुविधा भाविकांना निर्माण करून देण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
देवस्थानकडे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी गरज भासल्यास जिल्हा
परिषदेमार्फत जास्तीचे शौचालय व आरोग्य सेवा पुरवण्या बाबतच्या सूचना यावेळी आयुष
प्रसाद यांनी संबंधितांना दिल्या .
यावेळी देवस्थानच्या मार्फत काही मागण्याही करण्यात आल्या. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व कचरा
व्यवस्थापनासाठी घंटागाडी, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांमधून
संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, गणेश वन व दर्शन मार्गावर स्ट्रीट लाईट
या सर्व बाबींसाठी शासन स्तरावर मान्यता मिळून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी श्री
लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव जितेंद्र बिडवई यांनी देवस्थानच्या वतीने
केली. या सर्व कामाचे प्लान इस्टिमेट व प्रस्ताव दिल्यास ताबडतोब या सर्व मागण्या
पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुष प्रसाद यांनी दिले. तसेच रोपे वे साठी देखील
दोन कंपन्यांशी संपर्क झाला असून खासदार साहेबांशी चर्चा करून रोप वे साठी देखील
प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी साहेबांच्या शुभहस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. तसेच श्री
लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत गोळेगाव यांच्या वतीने त्यांचा
गणेशाची प्रतिमा, महावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हणे, सचिव जितेंद्र
बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे,  जयवंत डोके, भगवान ताम्हाणे,
गोळेगावच्या
सरपंच सुनीता मोधे, उपसरपंच हर्षल जाधव,  ग्रामसेवक
आशिष कोल्हे, संजली नाटे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मंगेश
दुराफे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद बिडवई, गणपत आधान,
पल्लवी
वाणी, अर्चना ताम्हाणे, रोहिदास बिडवई, संदीप ताम्हाणे,
आदी
मान्यवर उपस्थित होते.

 


 
							     
							     
							     
							     
 
 
 
 
.jpg) 
 
 
 
.jpeg) 
COMMENTS