विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 'हर घर तिरं...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 'हर घर तिरंगा 'अभियानामध्ये रॅलीचे आयोजन दिनांक 13/08/ 2022 रोजी करण्यात आले . या रॅलीसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उत्तम शेलार,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा .विलास कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. दीपेंद्र उजगरे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा . लोढा मॅडम, पर्यवेक्षक प्रा . श्रीमंते सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या रॅलीची सुरुवात करण्या अगोदर राष्ट्रीय सेवा योजना या विभागा अंतर्गत अमंली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. या प्रतिज्ञा चे वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ यांनी केले . त्यांच्या पाठोपाठ इतर प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी वाचन केले. या रॅलीचा मार्ग महाविद्यालयातून ते संपूर्ण जुन्नर शहर , जुन्नर नगर परिषद व रॅलीची सांगता जुन्नर तहसील कार्यालय व जुन्नर पोलीस स्टेशन येथे झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा लेहरावो,भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ, प्रा. स्वप्नील घोडेकर प्रा. मयूर चव्हाण, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रा. डॉ. कॅप्टन बाबासाहेब माने विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन कसबे त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. प्रा . प्रतिभा लोढा यांनी केले. या रॅलीसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा . सुरेश कुलाळ सर, प्रा . रावसाहेब कोकरे , प्रा . विकास वाघमारे व प्रा . शरद मनसुख, प्रा . शिवानंद,वाघमोडे व अनेक प्राध्यापिका तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला . विशेष म्हणजे या रॅलीमध्ये एकूण 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
COMMENTS