सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) दिनांक ५ ऑगस्ट २०२२ जुन्नर क्राईमनामा Live : डिसेंट फाउंडेशन आयोजित आदिवासी भागातील गुणवंत विद्या...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
दिनांक ५ ऑगस्ट २०२२ जुन्नर
क्राईमनामा Live : डिसेंट
फाउंडेशन आयोजित आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, भाषण
व्यासपीठ प्रदान कार्यक्रम व शेतकऱ्यांना सुरक्षा किट वाटप या कार्यक्रमात
सेंद्रिय शेतीचे प्रचारक कृषी तज्ञ डॉ. संतोष सहाणे बोलत होते.
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध
करण्यासाठी मुलांनी न बुजता आपल्या मनातील गोष्टी परखडपणे मांडल्या पाहिजेत , संभाषण
कौशल्य आत्मसात केले पाहिजे,
आपले ध्येय आपण
निश्चित केले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पाहिजेत. तरच
आपण इच्छित यश संपादन करू शकतो असे ते म्हणाले.
संतोष सहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त
दरवर्षी डिसेंट फाउंडेशनच्या वतीने नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी उपक्रम राबविले
जातात. याही वर्षी डिसेंट फाउंडेशन च्या वतीने आदिवासी भागातील २८ शाळांमधील
दहावीत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
देऊन करण्यात आला. यावेळी ग्रामीण आदिवासी भागातील मुले- मुली देखील वक्तृत्व
कौशल्यात मागे राहू नयेत म्हणून डिसेंट फौंडेशनच्या वतीने आदिवासी मुलींचे शासकीय
वसतीगृह या संस्थेस भाषण व्यासपीठ देखील भेट देण्यात आले. तसेच फाउंडेशनच्या वतीने
काही शेतकऱ्यांना सुरक्षा कीटचेही वाटप करण्यात आले. गेल्या पाच वर्षापासून
फाउंडेशन च्या वतीने कीटकनाशकांचा सुरक्षित वापर जनजागृती अभियान देखील राबवले
जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज गोळेगाव मधील काही शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप
करण्यात आले.
यावेळी जुन्नर पंचायत समितीचे कृषी अधिकारी
निलेश बुधवंत , बापू रोकडे , लक्ष्मण
झांजे , डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र
बिडवई , लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे
अध्यक्ष संतोष रासने , माजी नगरसेवक भाऊसाहेब कुंभार , अमोल
गायकवाड , गोरख गाडेकर , लेण्याद्री
देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हणे ,
जयवंत डोके , सावित्रीबाई
फुले वृद्धाश्रमाच्या संस्थापिका नंदाताई मंडलिक , दीपक
कोकणे , समीर जाधव , अशोक
वऱ्हाडी , सत्यवान खंडागळे , मंगेश
डोके , समीर ढोले , राजेंद्र
बिडवई , विद्यार्थी , पालक
व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिसेंट
फाउंडेशन चे प्रकल्प समन्वयक एफ.बी. आतार यांनी केले . प्रस्ताविक आदिवासी मुलींचे
शासकीय वस्तीगृहाच्या गृहपाल सौ अर्चना पवार यांनी केले , तर
आभार माजी मुख्याध्यापक प्रकाश चौधरी यांनी मानले.
COMMENTS