पुणे: खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात एका 65 वर्षीय वयोवृद्धाने पाळीव कुत्रीवर अत्याचार केल्याचा घाणेरडा प्रकार उघड झाला आहे. अत्याचार कर...
पुणे: खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात एका 65 वर्षीय वयोवृद्धाने पाळीव कुत्रीवर अत्याचार केल्याचा घाणेरडा प्रकार उघड झाला आहे. अत्याचार करतानाचा त्याचे व्हिडिओ काढण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळकरवाडी गावात हा प्रकार घडला आहे. ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर (राहणार, टाकळकरवाडी ता. खेड) असे या विकृताचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.
खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतो. त्याने राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. ज्येष्ठ नागरिकाने असे कृत्य केल्यामुळे सगळेच हैराण झाले होते. त्यामुळे या युवकांनी याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहेत.
COMMENTS