सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामधील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी ज्ञानदानाचे पवि...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामधील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारी अंजुमन उर्दू हायस्कूल ही दर्जेदार शैक्षणिक संस्था असून संस्थेच्या भौतिक आणि शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, अंजुमन साठी आपण सर्व मिळून संघटित निधी उभारूया असे आवाहन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी केले. अंजुमन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हाजी पापामिया तांबोळी यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी,संस्थेचे अध्यक्ष रईस चौगुलेउपाध्यक्ष मिर्झा कुददुस बेग, नगरसेवक फिरोज पठाण, हाजरा इनामदार, भाऊ देवाडे, पापा खोत,सचिव हाजीअनिस पटेल,सईद पटेल,सलीम गोलंदाज,सईद बेग, मोहम्मद उमर शेख, सईद शेख,समद इनामदार,रऊफ खान,वाजीद इनामदार इत्यादी मान्यवर, नागरिक, पालक व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते
सलग बत्तीस वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त होत असलेल्या प्राचार्य हाजी पापामिया तांबोळी यांनी शाळेसाठी केलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे.त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी व खेळाडू घडविण्याचे अनमोल कार्य तांबोळी सरांनी केली आहे असेही गौरवोद्गार आमदार बेनके यांनी काढले.
यावेळी प्राचार्य हाजी पापमिया तांबोळी यांना सेवापुर्ती निमित्त मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. प्राचार्य तांबोळी यांनी शाळेला एक्कावन्न हजार रुपये आणि हाजी उस्मान तांबोळी यांनी पंचवीस हजार रुपये रोख देणगी सुपूर्द केली.
यावेळी आमदार अतुल बेनके आणि हाजी उस्मान तांबोळी यांचा संस्थेच्यावतीने सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रईस चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन उजेर अन्सारी यांनी केले व आभार सहसचिव सईद पटेल यांनी मानले.
COMMENTS