सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी रक्षाबंधनच्या निमित्ताने एक धागा सैनिकांसाठी या...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी रक्षाबंधनच्या निमित्ताने एक धागा सैनिकांसाठी या उपक्रमाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे आयोजन जिल्हा परिषद शाळा गोळेगाव येथील विद्यार्थिनींनी भारताच्या सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या राख्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व रक्षाबंधन निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे एक धागा सैनिकांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी भारताच्या सीमांचे खडतर परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून अहोरात्र रक्षण करणा-या सैनिकांसाठी जिल्हा परिषद शाळा गोळेगाव येथील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या भारतीय लष्कराचे कमांडर यांच्याकडे पाठवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भारतीय हवाई दलामध्ये सेवा केलेले सेवानिवृत्त माजी सैनिक सुभाष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भारतीय हवाई दलामध्ये सेवा बजावलेले व १९७१ भारत पाकिस्तान युद्धा सहभागी माजी सैनिक रामदास मेहेर सीमा सुरक्षा दलामध्ये सेवा बजावलेले माजी सैनिक गणेश ताम्हणे हे उपस्थित होते त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या लष्करी सेवेतील प्रेरणादायी अनुभव व प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण याबाबत अनुभव आपल्या मनोगतात सांगितले विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना राख्या बांधण्यात आल्या व भारतीय सीमेवर देशरक्षणासाठी तैनात असलेल्या सैनिकांना पाठवण्यासाठी शाळेच्या वतीने राख्या त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. याप्रसंगी गोळेगावचे उपसरपंच हर्षल जाधव शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पल्लवीताई वाणी ग्रामपंचायत सदस्य अरविंद बिडवई अर्चना ताम्हणे गणपत आधान शिवाजी घोगरे ग्रामसेवक आशिष कोल्हे इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय उगले सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी मानले या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक मारुती साबळे किरण पवार उमेश शिंदे यांनी केले.
COMMENTS