सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे ( बांगरवाडी ...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट
संचलित समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे ( बांगरवाडी ) या तंत्रनिकेतन
महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच समर्थ
शैक्षणिक संकुलामध्ये संपन्न झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे येथील
माजी सहसंचालक डॉ.दिलीप नंदनवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव
विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ
पॉलीटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.नंदनवार यांनी प्रथमतः समर्थ पॉलिटेक्निक या तंत्रनिकेतन
महाविद्यालयास एन बी ए मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य, शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.नंदनवार म्हणाले की, यशस्वी
होण्यासाठी टीमवर्क तर महत्त्वाचे आहेच परंतु त्याचबरोबर शिक्षक, विद्यार्थी
आणि पालक यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर
नोकरी तर हमखास मिळतेच पण त्यासाठी तांत्रिक ज्ञानाबरोबर सॉफ्ट स्किल हे देखील
आवश्यक आहे. इंग्रजी
संवाद कौशल्य, देहबोली, व्यक्तिमत्व विकास हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. स्पर्धात्मक
युगामध्ये तांत्रिक कौशल्याबरोबर सादरीकरण, संवाद कौशल्य हस्तगत
केली पाहिजेत. विद्यार्थी व शिक्षकांनी देखील कालानुरूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
मशीन
लर्निंग, डाटा सायन्स, रोबोटिक्स, अनिमेशन हे तर
आवश्यक आहेच परंतु त्याचबरोबर नवनवीन ज्ञान मिळवणे देखील आवश्यक आहे. आपण जर स्वतःला
अपडेट केले नाही तर स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.ज्या क्षेत्रात आपण जाणार
आहोत त्या क्षेत्रातील नवनवीन ज्ञान व अपडेट राहणे आवश्यक आहे.लाईफ लॉंग लर्नर
राहणे गरजेचे आहे.शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया असून उच्च शिक्षण घेण्याची संधी
सोडू नका.स्वतः इम्प्रूमेंट करावी. मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा, जिद्द या जोरावर अधिक उंचीवर जाण्याचा
प्रयत्न करावा. मुलींनी
तांत्रिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना, मुलींना आरक्षण
असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न
करावा. खेडी
किंवा छोट्या गावातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवल्याची
अनेक उदाहरणे आहेत. आज रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ
उठवणे आवश्यक आहे.
तांत्रिक शिक्षणाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणजे शिकणारे विद्यार्थीच
आहेत. त्यामुळे
नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना असे यावेळी डॉ. नंदनवार म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय कंधारे यांनी प्रास्ताविक वल्लभ
शेळके यांनी तर आभार प्राचार्य अनिल कपिले यांनी मानले.
COMMENTS