सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : दि. ३१ - भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्य...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : दि. ३१ - भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी भाविकांची पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाद्रपद श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी सुमारे दीड लाख भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वाजता देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर भाविक भक्ताकरीता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, जयवंत डोके, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, गोळेगाव ग्रामस्थ व कर्मचारी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गिरीजात्मज गणेशाचे मूर्तीस व मंदिरात फुलांचे आकर्षक सजावट करण्यात आली होती.
दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने केले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.
Denominations can vary from 1 cent ("penny slots") all the way way|the means in which} as much as} $100.00 or more per credit. The latter are typically identified as|often known as} "excessive restrict" machines, and machines configured to 배당 사이트 allow for such wagers are often positioned in devoted areas . The machine mechanically calculates the number of credits the player receives in change for the money inserted. Newer machines often enable players select from|to select from} a selection of denominations on a splash screen or menu.
ReplyDelete