सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समाजाला संत विचाराची गरज असून विद्यार्थ्यांनी आई, वडील, गुरु व संत यांचे मनोभावे सेव...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समाजाला संत विचाराची गरज असून विद्यार्थ्यांनी आई, वडील, गुरु व संत यांचे मनोभावे सेवा करावी. त्यांची सेवा हीच देवाची पूजा असल्याचे मत जुन्नर तालुका विज्ञानअध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी कोल्हे मळा, नारायणगाव येथे व्यक्त केले.
जैन साध्वी ,प्रवचन प्रभाविका प. पू .अनुप्रेक्षाजी मा.सा. यांचा वाढदिवस स्व रामचंदजी बाबेल ट्रस्ट,धोलवड (पुणे) यांचे वतीने ,जिल्हा परिषद, शाळा,कोल्हे मळा, नारायणगाव येथील शाळेतील 44 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन साजरा केल्याची माहिती बाबेल ट्रस्ट चे सचिव प्रा.रतीलाल बाबेल यांनी दिली.
सन 2019 आली जैन सकल संघ व जैन सोशल क्लब यांच्या वतीने नारायणगाव या ठिकाणी गुरूणीमाँ प.पू. प्रभाकवरजी मा. सा. यांच्या सुशिष्या परमपूज्य अनुप्रक्षाजी मा.सा. परमपूज्य श्रुतुप्रभाजी मा.सा. परमपूज्य ऋजूप्रभाजी मा.सा. यांच्या उपस्थितीत अनेक धार्मिक विधी सह साजरा झाला त्या स्नेहबंधातून सन 2020 पासून स्वर्गीय रामचंदजी बाबेल ट्रस्ट यांच्या वतीने प. पू. अनुप्रेक्षाजी मा. सा. यांचा वाढदिवस साजरा केला जातो. जिल्हा परिषदेतील, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वैज्ञानिक पुस्तके व खाऊ वाटप करून हा वाढदिवस साजरा केला जातो.
याप्रसंगी बाबेल ट्रस्टचे सचिव म्हणाले की संतांचा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य कोणालाही मिळत नाही. ते आम्हाला मिळत आहे, आम्ही भाग्यवान आहोत. संतांनी सर्वस्वाचा त्याग केला असून ते समाजाला सतत ज्ञान देत असतात. संतांनी सांगितलेला मार्ग जर अनुसरला तर जगात शांतता नांदेल.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सरस्वती गायकवाड, उपशिक्षिका किशोरी तोडकर, सामाजिक कार्यकर्ते हेमंत भाऊ कोल्हे, विज्ञान संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, अक्षदा बाबेल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरी तोडकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रतीलाल बाबेल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार हेमंत भाऊ कोल्हे यांनी मानले.
COMMENTS