क्राईमनामा Live : श्रावणी बैलपोळ्यानिमित्त शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी जुन्नर तालुक्यातील धामणखेल या गावामध्ये बैलपोळा अतिशय आनंदाच्य...
क्राईमनामा Live : श्रावणी बैलपोळ्यानिमित्त शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी जुन्नर तालुक्यातील धामणखेल या गावामध्ये बैलपोळा अतिशय आनंदाच्या वातावरणात साजरा झाला.
यावेळी धामणखेल येथील विकास मडके यांच्या राजा या बैलाचा १८ वा वाढदिवस केक कापून साजरा केला.
ढोल, ताशा या पारंपरिक वाद्यांच्या निनादात धामणखेल परिसर दुमदूमून गेला होता.
खरं तर तालुक्यातील हा बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
धामणखेल गावातील शेतकरी बांधव आपआपले बैलांना भंडार, गुलाल, काजळ व रंगीबेरंगी रंगानी व फुलांनी सजवून गावातून मिरवणूकीच्या माध्यमातून फिरवताना मनमुराद आनंद घेत होते.
यात विशेष आकर्षण होते मडके व रघतवान यांच्या राजा बैलाचे या राजा बैलाचा वाढदिवस साजरा करताना त्याला केकदेखील भरवला गेला.
या अनोख्या बैलपोळ्याचे व वाढदिवसाचे परिसरातून कौतुक होत आहे.
COMMENTS