सहसंपादकः-प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे विद्यार्थ्यांना प्राचीन काळातील ऐतिहासिक वस्तूंचे प्रत्यक्ष ...
सहसंपादकः-प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे विद्यार्थ्यांना प्राचीन
काळातील ऐतिहासिक वस्तूंचे प्रत्यक्ष निरीक्षण करून माहिती मिळावी या उद्देशाने
शाळेत इतिहासाच्या पाऊलखुणा या अनोख्या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी केले होते.
इतिहास संशोधक व ऐतिहासिक वस्तूंचे संग्राहक व गोळेगाव शाळेचे माजी विद्यार्थी श्री. बापूजी
ताम्हाणे यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री.बापूजी ताम्हाणे यांनी
त्यांच्याकडे संग्रहित असणारे अश्मयुगीन कालखंडातील दगडी हत्यारे, हडप्पा
कालीन संस्कृतीतील व सातवाहन कालीन मातीची भांडी, मातीचे दागिने,
समुद्री शिंपले
मातीची खापराचीकौले हस्तिदंतापासून व प्राण्यांच्या हाडांपासून तयार
केलेल्या वस्तू, सातवाहनकालीन नाणी इत्यादी वेगवेगळ्या ऐतिहासिक वस्तू
विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून त्या प्रत्येक वस्तूंविषयी माहिती आपल्या
व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिली.
आपल्या पाठय पुस्तकातील वस्तू प्रत्यक्ष पाहताना व त्या
वस्तूंची माहिती ऐकतांना व हाताळताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून
वाहत होता. बापूजी ताम्हणे यांनी सुद्धा ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील
विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक वस्तूंची माहिती देतांना मनस्वी आनंद झाल्याचे
सांगितले
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन नाडेकर सर यांनी दिली. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. पल्लवीताई वाणी
या होत्या .या प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत गावातील अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित
होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय उगले सर यांनी केले तर आभार
श्री. किरण पवार सर यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन श्री. उमेश शिंदे सर व
मारुती साबळे सर यांनी केले
COMMENTS